पावसात वाहून गेली बंधाऱ्याची भिंत

By admin | Published: August 2, 2015 01:51 AM2015-08-02T01:51:12+5:302015-08-02T01:51:12+5:30

सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवानी नाल्यावर गुरांना उन्हाळ्यात पाणी मिळण्यासाठी बांधलेल्या बंधाऱ्याची भिंत यावर्षीच्या पावसात वाहून गेली.

The wall of the dam was carried away in the rain | पावसात वाहून गेली बंधाऱ्याची भिंत

पावसात वाहून गेली बंधाऱ्याची भिंत

Next

पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवानी नाल्यावर गुरांना उन्हाळ्यात पाणी मिळण्यासाठी बांधलेल्या बंधाऱ्याची भिंत यावर्षीच्या पावसात वाहून गेली.
कृषी व अन्य योजनेमधुन सदर नाल्यावर बंधारा बांधला होता. या बंधाऱ्याची बांधनी कंत्राकदाराने केली. दोन्ही बाजुची भिंत निकृष्ट दर्जाची असल्याचे शाखा अभियंता शेट्टी यांना कळविण्यात आले होते. मात्र कोणतीही चौकशी न करता हे काम सुरूच ठेवले. आता आलेल्या पावसानंतर पाण्याचा प्रवाह वाढल्याने ती भिंत खाली कोसळली. या बंधाऱ्याच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करून बिल थांबविण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The wall of the dam was carried away in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.