सरपंच व्हायचे,मग सातवा वर्ग उत्तीर्ण आहात का ? करा खात्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 05:00 AM2020-12-26T05:00:00+5:302020-12-26T05:00:22+5:30

राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या निवडणुकीत सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार नसून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड केली जाणार आहे. सरपंच पदासाठी अद्यापही आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही.

Want to be Sarpanch, then have you passed 7th class? Make sure! | सरपंच व्हायचे,मग सातवा वर्ग उत्तीर्ण आहात का ? करा खात्री !

सरपंच व्हायचे,मग सातवा वर्ग उत्तीर्ण आहात का ? करा खात्री !

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणूक विभागाची अट : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायत निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया : आता सरपंचाची निवड थेट जनतेतून केली जाणार असून निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंच निवडला जाणार आहे. सरपंचपदी विराजमान होण्यासाठी सदस्य सातवा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्या शिवाय त्याला सरपंच होता येणार नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे होणाऱ्या उमेदवाराला किमान सातवा वर्ग पास असणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीत उभे राहण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आधी सातवा वर्ग उत्तीर्ण आहे किंवा नाही याची खात्री करावी लागणार आहे. 
राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. या निवडणुकीत सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार नसून निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड केली जाणार आहे. सरपंच पदासाठी अद्यापही आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत थोडा उत्साह कमी दिसून येत आहे. तर गुरुवारी (दि.२४) राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहणारा उमेदवार किमान सातवा वर्ग उत्तीर्ण असण्याची अट जाहीर केली आहे. सातवा वर्ग उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करताना त्याचा पुरावा जोडावा लागणार आहे. 
म्हणजे सरपंच व्हायचे असले तर सातवा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना सुध्दा उमेदवारी देताना याची खात्री करावी लागणार आहे. १४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींचे महत्व फार वाढले आहे. तर विविध योजना सुध्दा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्यामुळे सरपंच हा सुशिक्षित असल्यास गावाचा कायपालट होवू शकतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरपंच पदासाठी लागू केलेली सातवा वर्ग उत्तीर्ण असल्याची अट फार कमी किमान १२ वर्ग उत्तीर्ण असल्याची अट ठेवणे आवश्यक होते असा सृूर नागरिकांमध्ये आहे. 

केवळ दोन उमेदवारांनी दाखल केले अर्ज
जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होवू घातली आहे. यासाठी २३ ते ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र मागील दोन दिवसात तिरोडा तालुक्यात १ आणि सालेकसा तालुक्यातील १ उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
१६३४ जागांसाठी ३ लाख ३८ हजार मतदार करणार मतदान 
१८९ ग्रामपंचायतींच्या १६३४ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ३ लाख ३८ हजार ४०५ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यंदा सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले नसल्याने निवडणुकीबाबत उमेदवारांमध्ये अनुउत्साह दिसून येत आहे.

 

Web Title: Want to be Sarpanch, then have you passed 7th class? Make sure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.