वॉर्ड क्रमांक-१ मध्य पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:22 AM2021-05-28T04:22:32+5:302021-05-28T04:22:32+5:30

साखरीटोला : कंत्राटदाराच्या हलगर्जीपणा व दिरंगiईमुळे येथील वॉर्ड क्रमांक-१ मधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे हाइवे सिमेंट ...

Ward No. 1 Central Water Shortage | वॉर्ड क्रमांक-१ मध्य पाणीटंचाई

वॉर्ड क्रमांक-१ मध्य पाणीटंचाई

Next

साखरीटोला : कंत्राटदाराच्या हलगर्जीपणा व दिरंगiईमुळे येथील वॉर्ड क्रमांक-१ मधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

येथे हाइवे सिमेंट रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र रस्त्याचे काम सुरू असताना पाणीपुरवठा विभागाची पाइपलाइन फोडल्याने पाणीटंचाईचे नवीनच संकट उभे झाले. मागील दोन वर्षांपासून कंत्राटदाराने पाइपलाइन फोडून ठेवल्यामुळे वाॅर्ड क्रमांक-१ मधील नागरिक नळयोजनेच्या पाण्यापासून वंचित आहेत. कंत्राटदार टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करतो. मात्र मोजकेच पाणी असल्याने अनेकांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना कोरोना संसर्ग काळातसुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतच्या वतीने या प्रकरणाची तक्रार आमदार सहसराम कोरोटे, कार्यकारी अभियंता राष्टीय महामार्ग आणि बांधकाम करणाऱ्या कंपनीला केली आहे. कंत्राटदाराने दोन वर्षांनंतर नुकतेच पाइपलाइनच्या कामाची सुरुवात केली, पण कामात पाहिजे तशी गती नसल्यामुळे किती दिवसात पाइपलाइन आणि नळजोडणीचे काम पूर्ण होईल हे सांगता येत नाही.

पाइपलाइनचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी ग्रामपंचायतीसह सामाजिक कार्यकर्ते सुद्धा प्रयत्न करीत आहेत. एका बाजूला कोरोना संक्रमणाचे संकट उभे आहे, तर दुसऱ्या बाजूला पाणीटंचाई. अशासमयी गावात पाणीटंचाई भेडसावू नये व वॉर्डवासीयांना ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे वितरित शुद्ध पाणी मिळावे अशी वॉर्डवासीयांची मागणी आहे

Web Title: Ward No. 1 Central Water Shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.