आमगाव-सालेकसा तालुक्यात मिळणार ४७२ हेक्टरला पाणी
By admin | Published: December 11, 2015 02:13 AM2015-12-11T02:13:50+5:302015-12-11T02:13:50+5:30
बाघ प्रकल्पातून यावर्षी उन्हाळी (रबी) हंगामात गोंदिया, आमगाव आणि सालेकसा तालुक्यांतील ११८० हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे.
बाघ प्रकल्प : उन्हाळी हंगामासाठी अखेर झाले नियोजन
गोंदिया : बाघ प्रकल्पातून यावर्षी उन्हाळी (रबी) हंगामात गोंदिया, आमगाव आणि सालेकसा तालुक्यांतील ११८० हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. त्यापैकी सालेकसा व आमगाव तालुक्यातील पाणी वाटपाचे नियोजन आ.संजय पुराम यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन केले आहे.
हिवाळी अधिवेशनात आ.पुराम व्यस्त असताना अधिकाऱ्यांना त्यांच्या उपस्थितीत नियोजन करण्यासाठी थोडी धावपळ करावी लागली. कार्यकारी अधिकारी छप्परघरे, आमगाव उपविभागीय अधिकारी एस.पी. राठोड यांच्या उपस्थितीत हे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले.
या नियोजनानुसार आमगाव उपविभागांतर्गत आमगाव शाखेअंतर्गत किकरीपार लघुकालव्यातून ८१ हेक्टर, शिवनी मायनर-२ मधून ४० हेक्टर, सालेकसा शाखेअंतर्गत पाथरी लघुकालव्यातून २० हेक्टर, सोनपुरी लघुकालव्यातून २० हेक्टर, मुडीपार लटोरी लघु कालव्यातून २० हे., बिंझली लघु कालव्यातून २० हे., भाडीपार लघु कालव्यातून १५ हे., तिरखेडी १ व २ मधून ४० हेक्टर, लोहारा लघु कालव्यातून २० हेक्टर तर विद्युत पंपातून ८१ हेक्टरला सिंचन होणार आहे.
पुजारीटोला शाखेअंतर्गत अंजोरा लघुकालव्यातून २५ हेक्टर, सातगाव लघु कालवा १ मधून २० हेक्टर तर सालईटोला वितरिकेतून ७० हेक्टरला सिंचन होणार आहे. असे एकूण २३६ हेक्टरमध्ये सिंचनाचे नियोजन करण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)