भुयारी बोगद्यात पुन्हा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 10:08 PM2019-07-06T22:08:06+5:302019-07-06T22:08:26+5:30

हलबीटोला रेल्वे भुयारी बोगद्याची पाणी समस्या अद्यापही मार्गी लागलेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात या भुयारी बोगद्यात पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण होत आहे. तीन किमीचा फेरामारुन हलबीटोलावासीयांना गोरेगावला यावे लागत आहे.

Water again in the groundwater | भुयारी बोगद्यात पुन्हा पाणी

भुयारी बोगद्यात पुन्हा पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : हलबीटोला रेल्वे भुयारी बोगद्याची पाणी समस्या अद्यापही मार्गी लागलेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात या भुयारी बोगद्यात पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण होत आहे. तीन किमीचा फेरामारुन हलबीटोलावासीयांना गोरेगावला यावे लागत आहे. ही समस्या लवकारात लवकर मार्गी न लावल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
सन २०१० ला हलबीटोला रेल्वे भुयारी बोगद्याची निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून पावसाळ्यात ह्या बोगद्यात नेहमी पाणी साचून राहते. ही समस्या मार्गी लावण्यात यावी, यासाठी वांरवार रेल्वे विभागाला निवेदन देण्यात आले. यानंतर रेल्वे विभागाने नाली आणि रस्त्याचे बांधकाम सुरू केले होते. पण त्यानंतर हे बांधकाम अर्धवट सोडण्यात आले. ते काम अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही.
त्यामुळे पाणी साचण्याची समस्या कायम आहे. पावसाळ्यात रस्त्याची स्थिती फारच दयनीय होते. रेल्वे भुयारी बोगद्यात सध्या स्थितीत पाच फुट पाणी साचून आहे. त्यामुळे हलबीटोला येथील नागरिकांना ये-जा करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.
रेल्वे विभागाने याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी माजी उपसरपंच राहुल कटरे, अफरोज कुरैशी, दिलीप पटले, रमेश पटले, डिलेश्वर पटले, राजकुमार रंगारी, नंदलाल पटले, रामचंद लटये, सुखदेव चुलपार, संतोष कृपाल, महेंद्र कृपाल, दिलीप बोपचे, योगेश पेटले, ग्यानीराम लटये, वामनराव लटये यांनी केली आहे.

Web Title: Water again in the groundwater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे