पाण्याचा व्यवसाय पोहोचला खेड्यांपर्यंत

By Admin | Published: May 10, 2017 01:10 AM2017-05-10T01:10:55+5:302017-05-10T01:10:55+5:30

येथून काही वर्षापूर्वी पाण्याचाही व्यवसाय होऊ शकतो या गोष्टीवर कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते.

The water business has reached the villages | पाण्याचा व्यवसाय पोहोचला खेड्यांपर्यंत

पाण्याचा व्यवसाय पोहोचला खेड्यांपर्यंत

googlenewsNext

नवा रोजगार : प्रत्येक कार्यक्र मात शुद्ध पाण्याच्या कॅनची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथून काही वर्षापूर्वी पाण्याचाही व्यवसाय होऊ शकतो या गोष्टीवर कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. परंतु पाणीटंचाई आणि शुद्ध पाण्याची मागणी यामुळे या काही वर्षात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय जिल्ह्यात सर्वत्र फोफावला आहे. तसेच केवळ श्रीमंतांच्या हातात दिसणाऱ्या शुद्ध पाण्याच्या कॅन आता गावखेड्यापर्यंत पोहचल्या आहेत.
शहरातील विविध समारंभात दिसणारे थंड पाण्याचे कुल क्रेज आता ग्रामीण भागातील समारंभारातही दिसत आहेत. वाढत्या उन्हासोबतच हा व्यवसाय आता तेजीत आला असून कुठे प्रतिष्ठा तर कुठे आरोग्य असे कारण पुढे करीत बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे. केवळ लग्न सोहळ््यासाठीच नव्हे तर लहानमोठ्या कार्यक्रमांतही, एवढेच नाही तर महाप्रसादाच्या कार्यक्रमातही शुद्ध व थंड पाण्याला वाढती मागणी आहे. केवळ उन्हाळ््यामध्ये चालणारा व्यवसाय आता बारा महिने सुरू आहे.
शुद्ध पाण्याचा वापर ही बाब आता गरजेची झाली आहे. लग्नात हौसेच्या खर्चाला फाटा देऊन प्रत्येकजण शुद्ध पाण्याचा आग्रह धरताना दिसत आहे. साधारणत: ५०० लोकांमागे ३० पाण्याचे जार लागतात. प्रत्यक जारमध्ये २० लिटर पाणी असते. एक हजार लोकांसाठी ६० जार लागतात. सुमारे ५० रूपये प्रत्येक जारमागे आकारले जाते. प्रत्येक बाबतीत सोहळ््यात टापटीपपणा दिसून यावा तसेच पाहुण्यांची उत्तम व्यवस्था व्हावी असा सर्वांचा आग्रह असतो. लग्न कार्यात काम करणारे मनुष्यबळ दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे पंगतीऐवजी बुफेसारखे जेवणाचे प्रकार वाढले आहेत.
लग्नप्रसंगासोबतच महाप्रसादालाही बुफेची व्यवस्था केली जात आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. ग्रामीण भागातही आरोग्यविषयक जागरूकता वाढली आहे. विविध समारंभासाठी शहरातून पाणी आणले जाते. दोन पाण्याच्या बाटल्यांच्या किमतीत २० लिटरचा एक जार मिळतो. त्यामुळे शहरातील व्यापारी प्रतिष्ठानने माठाच्या जागी आता पाण्याचे जार ठेवत आहेत.
त्यातही उन्हाळ््यात तर पाणी व्यवसायिकांना श्वास घ्यायला वेळ राहत नसतो, एवढी त्यांच्या पाण्याची डिमांड असते. त्यामुळे स्पेशल गाड्यांतूनच डिलीव्हरी केली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
कॉल करून आपली डिमांड त्यांना कळविली की लगेच गाडी येऊन तुम्हाला डिलीवरी देऊन जाते. घरबसल्या व्यवस्था होत असल्याने शिवाय प्रतिष्ठेला साजेशे दिसत ्असल्याने नागरिकांचा कल याकडे वाढत चालला आहे.
सध्या लग्नसराईची धूम सुरू आहे. प्रत्येक लग्नात पाण्याचे कॅन व प्लॉस्टिकचे ग्लॉस मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे चित्र प्रत्येक ठिकाणी नजरेस पडते. पूर्वीच्या काळात पंगत बसायची व त्यात भोजन वाढणाऱ्यांसह पाणी वाढणारी मुले सुद्धा असायची. परंतु ही प्रथा आता कालबाह्य ठरत आहे. प्रत्येक समारंभात पाण्याचे कॅन व प्लास्टिकचे ग्लॉस ठेवले जातात. प्रत्येक व्यक्ती सेल्फ सर्व्हिसप्रमाणे कॅनजवळ जावून स्वहस्ते पाणी काढून प्राशन करतो.

एका फोनवर मिळते पाणी
लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे पाहुण्यांची लगबग असते. अशावेळी सर्वांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करणे सहज शक्य होत नाही. या कारणाने कूल क्रेजची मागणी वाढली आहे.
एका फोनवर लागेल तेवढे शुद्ध व थंड पाणी मिळत असल्याने नागरिकांनाही ते परवडते.
शुद्ध पाणी एका फोनवर जरी मिळत असले तरी ते किती शुद्ध आहे हा प्रश्न निर्माण होतो. याकडेही लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
 

Web Title: The water business has reached the villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.