जलसंधारणच्या कार्यालयाला ठोकले कुलूप ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:30 AM2021-04-02T04:30:03+5:302021-04-02T04:30:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : जलसंधारण तथा मृद विभागाच्या उपविभागीय कार्यालयाने चार वर्षांपासून घरभाड्याची रक्कम दिली नाही. वारंवार स्मरणपत्र ...

Water Conservation Office Locked () | जलसंधारणच्या कार्यालयाला ठोकले कुलूप ()

जलसंधारणच्या कार्यालयाला ठोकले कुलूप ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सालेकसा : जलसंधारण तथा मृद विभागाच्या उपविभागीय कार्यालयाने चार वर्षांपासून घरभाड्याची रक्कम दिली नाही. वारंवार स्मरणपत्र देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. एकूण ३ लाख ६७ हजार रुपयांचे घरभाडे थकवल्याने १ एप्रिल रोजी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा लिखीत इशारा देऊनही जलसंधारण विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे घरमालक वासुदेव फुंडे यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले.

सालेकसा या तालुका मुख्यालयी मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाकरिता शासकीय जागा उपलब्ध नसल्याने ऑक्टोबर २०१६मध्ये करारनामा करुन वासुदेव कृष्णराव फुंडे यांचे घर कार्यालयाकरिता विभागाने भाडेतत्वावर घेतले. दरमहा ६ हजार ८०० रुपये भाड्याचा करार करण्यात आला. दर महिन्याला भाडे देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, भाडे देण्यात येत नाही. भाडे देण्यात यावे, याकरिता २०१७पासून वासुदेव फुंडे यांनी विभागाकडे पत्रव्यवहार केला. पण दरवेळी काही ना काही कारण पुढे करून भाडे देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. चार वर्षांपासूनचे भाडे थकल्याने वासुदेव फुंडे अडचणीत सापडले आहेत. त्यांची प्रकृती बिघडली. वासुदेव फुंडे यांनी ३० मार्चपर्यंत भाडे न दिल्यास कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतरही संबंधित विभागाला जाग आली नाही. त्यामुळे गुरुवारी (दि. १) वासुदेव फुंडे यांनी मुलगा पराग फुंडे याच्यासोबत कार्यालयाला कुलूप ठोकले.

......

१ लाखाचा धनादेश केला परत

कुलूप ठोकल्यानंतर विभागाने १ लाख रुपयांचा धनादेश वासुदेव फुंडे यांच्याकडे पाठवला. मात्र, त्यानंतरही २ लाख ६७ हजार २०० रुपयांचे भाडे थकीत असल्याने संपूर्ण भाडे द्या तेव्हाच कुलूप उघडून देणार असल्याचा पवित्रा फुंडे यांनी घेतला. किमान उर्वरित भाडे केव्हा देणार, हे तरी लिखित द्या तेव्हाच काय ते बघू, या मागणीवर वासुदेव फुंडे अडून बसले होते.

Web Title: Water Conservation Office Locked ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.