जिल्ह्यातील १६०० अंगणवाड्यांत उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:39 AM2021-02-27T04:39:38+5:302021-02-27T04:39:38+5:30

गोंदिया: चिमुकल्या बालकांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी त्यांना दोन अडीच वर्षातच अंगणवाडीत पाठविले जाते. परंतु अंगणवाडीत जाणाऱ्या चिमुकल्या मुलांना ...

Water crisis (dummy) before 1600 Anganwadas in the district | जिल्ह्यातील १६०० अंगणवाड्यांत उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट (डमी)

जिल्ह्यातील १६०० अंगणवाड्यांत उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट (डमी)

Next

गोंदिया: चिमुकल्या बालकांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी त्यांना दोन अडीच वर्षातच अंगणवाडीत पाठविले जाते. परंतु अंगणवाडीत जाणाऱ्या चिमुकल्या मुलांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. चिमुकल्या कळ्यांना बहरण्यासाठी पोषक वातावरण देण्यापेक्षा दूषित पाण्यातून त्यांची वाढ करण्याचा प्रकार जिल्ह्यातून दिसून येत आहे. जिल्ह्यातील १८०५ अंगणवाड्यांपैकी तब्बल १६०० अंगणवाड्यांमध्ये नळ जोडणी केलेल्या नसल्यामुळे हातपंप, विहिरी किंवा अन्य स्त्रोतातून चिमुकल्यांची तहान भागवावी लागत आहे. जिल्ह्यातील १८०५ अंगणवाडीपैकी २०५ अंगणवाडीमध्ये नळ जोडण्या करण्यात आलेल्या आहेत. तर १ हजार ६०० अंगणवाड्यांना नळ जोडणी केलेली नाही. त्यामुळे या चिमुकल्यांना शुद्ध पाणी कसे मिळेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. उन्हाळ्यापूर्वीच जिल्ह्यातील १६०० अंगणवाडीत जलसंकट निर्माण झाले आहे. त्यात गोंदिया तालुक्यातील ३४३ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणी नाही. अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील २०३, सालेकसा तालुक्यातील १८०, देवरी तालुक्यातील १९१, सडक अर्जुनी तालुक्यातील १६५, आमगाव तालुक्यातील १५३, तिरोडा तालुक्यातील १८२, गोरेगाव तालुक्यातील १८४ असे एकूण १६०० अंगणवाड्यात नळजोडणी करण्यात आली नाही.

बॉक्स

तालुका अंगणवाड्या नळ जोडण्या नसलेल्या अंगणवाड्या

गोंदिया १ २०९ - १९२

गोंदिया-२ १६१ १५१

सालेकसा २०१ २०३

अर्जुनी-मोरगाव २३० १८०

देवरी २१९ १९१

सडक-अर्जुनी १८९ १६४

आमगाव १७८ १५३

तिरोडा २१४ १८२

गोरेगाव २०४ १८४

एकूण १८०५ १६००

.........

एकूण आंगणवाड्या १८०५

नळ जोडणी नसलेल्या आंगणवाड्या १६००

.......

Web Title: Water crisis (dummy) before 1600 Anganwadas in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.