अग्निशमन यंत्रणेच्या पाण्याचा उपयोग भांडे धुण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 09:56 PM2018-05-21T21:56:34+5:302018-05-21T21:56:48+5:30
रुग्णालयात एखाद्या वेळेस आग लागल्याची घटना वेळीच उपाय योजना करण्यासाठी रुग्णालयाच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली आहे. मात्र याच यंत्रातील पाण्याचा रुग्णांचे नातेवाईक धुणी-भांडी धुण्यासाठी वापर करीत असल्याचे चित्र येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रुग्णालयात एखाद्या वेळेस आग लागल्याची घटना वेळीच उपाय योजना करण्यासाठी रुग्णालयाच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली आहे. मात्र याच यंत्रातील पाण्याचा रुग्णांचे नातेवाईक धुणी-भांडी धुण्यासाठी वापर करीत असल्याचे चित्र येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
जिल्ह्यातील एकमेव शासकीय बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली आहे. या यंत्रणेचे नुकतेच नुतनीकरण सुध्दा करण्यात आले. एखाद्या वेळेस रुग्णालयात आग लागल्याची घटना घडल्यास अशा स्थिती वेळीच उपाय योजना करण्यासाठी मदत व्हावी, रुग्णांच्या जीवाला धोका पोहचू नये, यादृष्टीने अग्निश्मन यंत्रणा लावण्यात आली. मात्र मागील काही दिवसांपासून रुग्णालयाच्या इमारतीला लावलेल्या अग्निश्मन यंत्रणेच्या लावलेल्या पाईपमधील पाण्याचा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक धुणी-भांडी धुण्यासाठी वापर करीत आहेत. त्यामुळे या यंत्रणेच्या सुरक्षेवर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. अग्निश्मन यंत्रणेच्या पाईपमधील पाण्याचा सर्रास वापर केला जात असताना या गंभीर प्रकाराकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या काही जागृत नागरिकांनी ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात सुध्दा आणली.
रुग्णालयाच्या इमारतीला सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा लावण्यात आली आहे. मात्र पाईप लाईनचे लॉक तुटले असल्याने त्यातून रुग्णांचे नातेवाईक पाणी नेत आहे. लवकरच याची दुरूस्ती करुन नवीन लॉक लावण्यात येईल.
- डॉ. प्रदीप कांबळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, बीजीडब्ल्यू रुग्णालय गोंदिया