खळबंदा जलाशयातील पाणी शेतीकरिता सोडले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:20 AM2021-07-21T04:20:44+5:302021-07-21T04:20:44+5:30
गोंदिया : माजी आमदार राजेंद्र जैन महालगाव येथे आले असता परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीकरिता लागणाऱ्या पाण्याची समस्या त्यांच्या निदर्शनात ...
गोंदिया : माजी आमदार राजेंद्र जैन महालगाव येथे आले असता परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीकरिता लागणाऱ्या पाण्याची समस्या त्यांच्या निदर्शनात आणून दिली. याची दखल घेत त्यांनी तात्काळ पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले, सहायक अभियंता संजीव सहारे व शाखा अभियंता डी.एस.लेंडे यांना संपर्क करून जलाशयातील पाणी सोडण्याचे निर्देश दिले. यावर लगेच संबंधित विभागाव्दारे जलाशयातील पाणी सोडण्यात आले.
पावसाने दडी मारल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहे. झालुटोला, खळबंदा, दवनीवाडा, देऊटोला, बोदा गोंडमोहाळी, महालगाव, मुरदाडा, धापेवाडा, लोधीटोला, पिपरटोला, बिजाईतोला, वळद, खतिटोला, सहेसपूर, सेजगाव, सोनेगाव, नहारटोला, अत्री, परसवाडा, बोरा, डब्बेटोला, अर्जुनी, खैरलांजी, करटी, इंदोरा, बीबीटोला ही सर्व गावे लाभक्षेत्रात येत असून या गावांना जलाशयाच्या पाण्याचा उपयोग होणार आहे. यावेळी गुड्डू बोपचे, कृष्णकुमार जायस्वाल, प्रदीप रोकडे, नरहरप्रसाद मस्करे, नीरज उपवंशी, कृष्णकुमार ठाकरेले, कान्हा बघेले, दिनेश लिल्हारे, परमानंद उपवंशी, भोजराज रहांगडाले, शंकरलाल टेभरें, तेजलाल लिल्हारे, रतनलाल पारधी, थनिराम माहले, मोरेश्वर नागपुरे, श्यामकला चौधरी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.