पाणी बचतीसाठी धडपडणारा शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 10:13 PM2019-06-03T22:13:16+5:302019-06-03T22:13:34+5:30
उन्हाळ्याच्या सुट्यांचा उपभोग घेणे म्हणजे शिक्षकांसाठी आनंदाची पर्वणी असते. बरीच शिक्षक मंडळी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये कुटुंबासह फिरायला जातात तर कुणी इतर कामात गुंतले असतात. परंतु अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अरततोंडी (इळदा) येथील विजयकुमार सखाराम लोथे यांनी उन्हाळ्यांच्या सुट्यांचा सदुपयोग करीत पाणी बचतीसाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवित आहे. पाणी वाचवा, जीवन वाचवा, हा आगळा-वेगळा उपक्रम हाती घेऊन लोकांसमोर आदर्श ठेवला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : उन्हाळ्याच्या सुट्यांचा उपभोग घेणे म्हणजे शिक्षकांसाठी आनंदाची पर्वणी असते. बरीच शिक्षक मंडळी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये कुटुंबासह फिरायला जातात तर कुणी इतर कामात गुंतले असतात. परंतु अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अरततोंडी (इळदा) येथील विजयकुमार सखाराम लोथे यांनी उन्हाळ्यांच्या सुट्यांचा सदुपयोग करीत पाणी बचतीसाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती मोहीम राबवित आहे. पाणी वाचवा, जीवन वाचवा, हा आगळा-वेगळा उपक्रम हाती घेऊन लोकांसमोर आदर्श ठेवला आहे.
विजयकुमार लोथे असे त्या ध्येयवेड्या शिक्षकाचे नाव आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्याला दरवर्षी पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागते. पाणी टंचाईला प्रशासन जरी जबाबदार असले तरी काही प्रमाणात नागरिक सुध्दा जबाबदार आहे. त्यामुळेच पाणी बचतीसाठी आत्ताच उपाय योजना केली नाही तर भावी पिढीसाठी पाणी शिल्लक राहणार की नाही याबाबत शंका आहे. नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी लोथे यांची धडपड सुरू आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील गावा-गावात जावून पाणी बचत करण्यासंबंधिचे पत्रक तयार करुन येणाऱ्या पिढीसाठी पाणी कसे वाचविता येईल याची जनजागृती करीत लोथे आहेत. त्यांच्या स्वलिखीत कवितेतून संदेश दिला आहे की ‘शोध घेत पाण्याचा, सारेच चालले खोल-खोल’ भूर्गभातून आवाय येतोय, संपली बाबा आता ओल’ वारे माप उपसा करतोय,अडवत नाही पाणी’किती वर्षे वागणार आहेस, असाच वेड्यावानी, निसर्गाने दिल्याशिवाय, भांडे भरता येत नाही, विनाकारण सांडवू नकोस, पाणी तयार करता येत नाही. या कवितेतून नागरिकांना त्यांनी पाणी वाचविण्याचा संदेश दिला आहे.
२५-३० वर्षापूर्वी पावसाळ्यात सतत चार महिने पाऊस पडायचा. कधी मुसळधार तर कधी रिमझिम. यामुळे भूर्गभात पाण्याचा साठा भरपूर प्रमाणात तयार होत असे. तेव्हा पिण्याच्या पाण्याची आणि शेतीला पाणी देण्याची समस्या नव्हती. त्यावेळी विद्युत मोटारपंप बोटावर मोजण्या इतकी होती. विहिरीतील पाणी विद्युत पंपाद्वारे किंवा मोटारपंपाव्दारे पिकांना पाणी देण्याची पद्धत होती. परंतु अलीकडे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. परिणामी भूगर्भातील संरक्षित पाणी साठ्यावर सुध्दा याचा परिणाम होत आहे.
विहिरी, बोअरवेलनी सुध्दा तळ गाठण्यास सुरूवात केली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपीक लावण्यास सुरुवात केली.१५०-२०० फुटापर्यंत बोअरवेलच्या सहाय्याने पाण्याचा उपसा केला जात आहे. परिणामी भूृर्गभातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होवू लागली. शुद्ध पाणी मिळण्याचे स्त्रोत कमी झाले. येणाºया काळात पिण्याच्या पाण्याची समस्या समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. लोथे हा मूलमंत्र गावात गावात पोहचून नागरिकांना देत आहे.
कमीत कमी पाच वृक्ष लावा
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रत्येक गावा-गावात जावून पाणी वाचवा, पाणी जीरवा, उन्हाळी धानपीक घेवू नका, ठिबक सिंचन योजनेचा वापर करा, धानपिकापेक्षा कमी पाण्याचे पीक घ्या, आपल्या घरी किमान पाच वृक्ष लावा, वन्यप्राणी व पक्ष्यांचा विचार करा असा संदेश पोहोचवून लोकजागृती करुन लोथे उन्हाळ्यांच्या सुट्यांचा सदुपयोग करीत आहेत.