पाण्याचे नियोजन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:40 PM2017-09-17T23:40:30+5:302017-09-17T23:40:40+5:30
लोकसहभागातून पाण्याचे नियोजन व संग्रहन करण्यासाठी पावसाचे पाणी जल व्यवस्थापनातून साठवणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : लोकसहभागातून पाण्याचे नियोजन व संग्रहन करण्यासाठी पावसाचे पाणी जल व्यवस्थापनातून साठवणे आवश्यक आहे. यासाठी आतापासून व्यापक आराखडा व अंमलबजावणी करण्याची गरज आहे, असे आवाहन तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी केले आहे. ते येथे पाणलोट आराखडा अंमलबजावणी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.
येथे पाणलोट आराखडा अंमलबजावणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन एलीवन सोसायटी फार इन्फरप्रेन्सेड शिव एज्यकेशन (एसीड) जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय , तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
शिबिराला मार्गदर्शक म्हणून जी.बी. तोडसाम, तंत्र अधिकारी एस.एस. बन्सोड, प्रा.जी.एस.भदाडे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रशांत सांगळे म्हणाले की, येणाºया काळात पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करु शकते. दिवसेंदिवस पाण्याचे प्रमाण व पातळी कमी होत चालली आहे. पावसाने अनियमितपणा दाखविला. अल्पपावसामुळे भविष्यात पाणी साठा टिकवून ठेवणे सर्वात मोठे आव्हाण असते. पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीत शासन प्रशासन स्तरावर नेहमी प्रशिक्षण दिले जाते.
जलस्तरावर उपाय योजना सांगिेतल्या जातात. परंतु लोक सहभागाअभावी सर्व उपाय निरर्थक ठरतात. जर अशीच परिस्थिती चालत राहिली तर येणारा काळ आव्हानात्मक राहून शेतीसाठी पाण्याचे संकट तर निर्माण होईल त्याचबरोबर जनावरांना व लोकांना पिण्याच्या पाण्यासह विविध उपयोगासाठी पाण्याचा मोठा संकट उभा होणार आहे. वेळेवर प्रभावी उपाययोजना व जलसाठ्याचा नियोजन करणे आवश्यक आहे. मृद व जलसंधारण विभाग महाराष्टÑ शासन जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गावातील पाणलोट आराखडे अंमलबजावणी प्रशिक्षण अंतर्गत सालेकसा तालुक्यातील पिपरिया, रामटोला, साखरीटोला, महारीटोला, नवाटोला किंवा जांभळी या गावाची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगीतले.
प्रत्येक गावात दोन शासकीय कर्मचारी व तीन पदाधिकारी अशा पाच लोकांना तीन दिवसांच्या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून प्रशिक्षण देण्यात येईल असेही ते म्हणाले. संचालन एसीडचे राज्य समन्वयक राजकुमार रामटेके यांनी केले. आभार जांभूळकर यांनी मानले.