जिल्ह्यातील जलाशये झाली ड्राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:39 PM2018-05-04T23:39:17+5:302018-05-04T23:39:17+5:30

मे महिन्यातच जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठे प्रकल्प ड्राय झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. तर तलाव व बोड्यासुध्दा कोरड्या पडल्या असल्याने पशुपालकांसमोर जनावरांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

The water reservoirs in the district were dry | जिल्ह्यातील जलाशये झाली ड्राय

जिल्ह्यातील जलाशये झाली ड्राय

Next
ठळक मुद्देपाणी टंचाईच्या समस्येत वाढ : पशुपालक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मे महिन्यातच जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठे प्रकल्प ड्राय झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. तर तलाव व बोड्यासुध्दा कोरड्या पडल्या असल्याने पशुपालकांसमोर जनावरांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यावर पाणी टंचाईची समस्या बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. मात्र मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे. तर २५ प्रकल्पांमध्ये थेंब भरही पाणी शिल्लक नाही. मध्यम प्रकल्पातील कलपाथरी, लघू प्रकल्पातील ज्या तलावांमध्ये ही स्थिती आहे त्यात मध्यम प्रकल्पाच्या कलपाथरी, लघू प्रकल्पाच्या डोंगरगाव, रिसाला, ओवारा, जुन्या मालगुजारी तलावांमध्ये भानपूर, बोपाबोडी, चान्ना बाक्टी, चिरचाळबांध, चिरचाडी, फुलचूर, गिरोली, कोहलगाव, कोसबी बाकी, ककोडी, काटी, कोकणा, खोडशिवनी, खाडीपार, माहुली, मालीजुंगा, मेंढा, नांदलपार, पळसगाव (सौंदड), पळसगाव, तेढा यांचा समावेश आहे. या गावांमध्ये काही प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील काही मोठ्या तलाव व जलशयांमध्ये पुरेसा जलसाठा नाही. तिरोडा तालुक्याच्या चोरखमारा येथे १.९१, गोंदिया तालुक्याच्या खळबंदामध्ये ५.३३, गोरेगाव तालुक्याच्या कटंगी येथे ६.९९ टक्के पाणी बाकी आहे. लघू प्रकल्पाच्या भदभद्या येथे ४.७१, गुमडोह २.८१, कालीमाटी ५.२६, पिपरिया २.९८, पांगडी ३.५३, सोनेगाव ६.७१, बेवारटोला ७.५९, जुन्या मालगुजारी तलावांमधून भिवखिडकी ७.९८, खैरी येथे ६.५७, कोसमतोंडी ३.३०, लेंडेझरी ४.२१, सौंदड ३.३६ व ताडगावमध्ये ३.४६ टक्के पाणी उरले आहे. या तलावांपैकी बहुतेक तलाव कोरडे पडले आहे.
केवळ ९ टक्केच पाणीसाठा
गोंदिया जिल्ह्याच्या मध्यम, लघू व जुन्या मालगुजारी तलावांची संख्या ६५ आहे. या सर्व तलावांमध्ये ९.७९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी जिल्ह्याच्या तलावांमध्ये आजच्या स्थितीत १७.८० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मध्यम प्रकल्पाच्या ९ तलावांमध्ये ७.०७, लघू प्रकल्पाच्या २२ तलावांमध्ये ११.६३ व जुन्या मालगुजारी ३८ तलावांमध्ये ९.८९ टक्के पाणी शिल्लक आहे. मागील वर्षी केवळ ६० टक्के पाऊस झाल्यामुळे लवकरच पाणी आटले आहे. पुढील १५ दिवसांनंतर जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार होवू शकते. आतापासूनच प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: The water reservoirs in the district were dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.