जिल्ह्यातील ६२ गावे जलयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:00 AM2019-01-07T00:00:37+5:302019-01-07T00:01:08+5:30
राज्याला २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी व पाणीे टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवड झालेले ६२ गाव शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. मागील तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्याला २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त करण्यासाठी व पाणीे टंचाईची समस्या दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये निवड झालेले ६२ गाव शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत. मागील तीन वर्षात २३३ गावातील भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी या गावांत आता जलयुक्त शिवारच्या कामाची गरज नाही.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २१५-१६ वर्षात ९४ गावे, २०१६-१७ मध्ये ७७ गावे, व २०१७-१८ या वर्षात ६३ गावांची निवड करण्यात आली होती.
या अभियानाच्या पहिल्या टप्यात ९४ गावे, दुसऱ्या टप्यात ७७ गावे वॉटर न्यूट्रल झाल्यानंतर तिसºया टप्यात ६३ गावांपैकी ६२ गावे शंभर टक्के तर एक गाव ८० टक्के वॉटर न्यूट्रल झाले आहे.
सन २०१७-१८ निवड झालेल्या गावांत गोरेगाव, गोंदिया, तिरोडा या तालुक्यातील प्रत्येकी १० गावे, आमगाव व सडक अर्जुनी प्रत्येकी ६ गावे, देवरी, अर्जुनी-मोरगाव व सालेकसा तालुक्यातील प्रत्येकी सात गावांची निवड करण्यात आली होती. ही सर्व गावे शंभरटक्के वॉटर न्यूट्रल झाली आहेत.
केवळ सालेकसा तालुक्यातील एक गाव ८० टक्के वॉटर न्यूट्रल झाला आहे. सन २०१७-१८ मध्ये अभियानांतर्गत १९९१ कामांना मंजूरी देण्यात आली होती. यात कृषी विभाग १४३८, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग १८३, पंचायत समिती १३६, जलसंधारण २०, वन विभाग १३४ तर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या ८० कामांचा समावेश आहे. मंजूर कामांपैकी १७५५ कामांना कार्यारंभ करण्याचे आदेश देण्यात आले. १३५९ कामे सुरू करण्यात आले. निवड झालेली सर्व गावांत जलयुक्त शिवार कामांमुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे.
यावर्षीची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.