आमदारांनी घेतला जलयुक्तचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:40 IST2017-12-10T00:39:34+5:302017-12-10T00:40:56+5:30
स्थानिक तहसील कार्यालयात जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा आढावा आ. विजय रहांगडाले यांनी गुरूवारी (दि.७) घेतला. तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर झाल्यामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत आपल्याला दुष्काळावर मात करता येईल.

आमदारांनी घेतला जलयुक्तचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : स्थानिक तहसील कार्यालयात जलयुक्त शिवार अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचा आढावा आ. विजय रहांगडाले यांनी गुरूवारी (दि.७) घेतला.
तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर झाल्यामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत आपल्याला दुष्काळावर मात करता येईल. अशी कामे हाती घेऊन ती लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश बैठकीत आ. रहांगडाले यांनी दिले. तिरोडा-गोरेगाव तालुक्यात तलाव खोलीकरणाचे, गाळ काढणे, गरजेच्या ठिकाणी बंधारा बांधणे, नवीन कोल्हापुरी बंधाºयाची निर्मिती करणे, जुन्या बंधाºयाची दुरुस्ती करणे, नाला खोलीकरण करणे यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. अशी जास्तीत जास्त कामे करण्यास सांगितले. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामे तातडीने सुरू करुन गावातील प्रत्येक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करा. तसेच तालुका क्रीडा संकुलनाचे हस्तांतर लवकरात लवकर करण्याचे निर्देश क्रीडा अधिकाºयांना दिले.
तिरोडा गोरेगाव तालुक्यातील पैसेवारी योग्य काढून शासनास पाठविण्यास सांगितले. सभेला उपविभागीय अधिकारी गंगाधर तडपादे, तहसीलदार संजय रामटेके, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, कृषी अधिकारी पोटदुखे, वनपरिक्षेत्र अधिकारी, अभियंता लघू पाटबंधारे विभाग व कर्मचारी उपस्थित होते.