बांधकाम व्यवसायाला पाणी टंचाईचा फटका

By Admin | Published: May 26, 2016 12:45 AM2016-05-26T00:45:43+5:302016-05-26T00:45:43+5:30

तीव्र उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. या ऋतूमध्ये पाण्याची आवश्यकता असते. भूगर्भात पाण्याची पातळी खालाव्यामुळे एप्रिल महिन्यात कोरड्या झाल्या.

Water scarcity in the construction business | बांधकाम व्यवसायाला पाणी टंचाईचा फटका

बांधकाम व्यवसायाला पाणी टंचाईचा फटका

googlenewsNext

मजुरांचे हाल : साहित्यात दरवाढ
रावणवाडी : तीव्र उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. या ऋतूमध्ये पाण्याची आवश्यकता असते. भूगर्भात पाण्याची पातळी खालाव्यामुळे एप्रिल महिन्यात कोरड्या झाल्या. काही कोरड्या होण्याच्या वाटेवर आहेत. गावातील जलस्त्रोत आटल्याने बांधकाम व्यावसायकांनाही त्याचा फटका बसला आहे. या व्यसायावर बऱ्याच महिन्यापासून मंदीचे सावट आहे. या व्यवसायावर उपजिवीका करणारे या व्यवसायावर अवलंबून राहणाऱ्या काामगारांना मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे.
काही दिवसापासून रेती मिळणे सुरू झाले मात्र तेही भाव वाढले आहेत. सिमेंट मध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. या कारणाने विटाचे भाव मोठ्याने घसरले. ज्या विटभट्ट्यात ५ हजार रुपये प्रति ट्रॅक्टर मिळणारे विटा ३५०० ते ३६०० रुपये प्रतिट्राली लोक घेत नाहीत. उन्हाळ्यात सध्या सर्वत्र पाणी टंंचाईने बांधकाम व्यसायावर परिणाम स्पष्ट जाणवत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मजूर शेतीची कामे उरकवून काही महिने बांधकाम व्यवसायात हातभार लावतात.
यंदा पाणी टंचाईला महागाईची जोड मिळल्याने बांधकाम व्यवसायावर चांगलाच परिणाम जाणवत आहे. बांधकामातील हा मंदीचा फटका सरळ व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुुंबियांना पडला आहे. या व्यवसायात अनेक वर्षापासून काम करणाऱ्या कामगारांना काम मिळणे कठिण झाले आहे. साहित्याच्या वाढत असलेल्या किमतीमुळे बांधकाम करने प्रत्येकांना पेलवण्यासारखे नाही. म्हणून ही अनेक बांधकामे पूर्ण तहा ठप्प पडली आहेत.काही ठिकाणी पिण्याकरिता पुरेसे पाणी नाही. तर बांधकामासाठी पाणी देणे शक्यच नाही. (वार्ताहर)

Web Title: Water scarcity in the construction business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.