प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:07 PM2018-04-26T22:07:36+5:302018-04-26T22:07:36+5:30
गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणीपूर्ती करण्याचे आमचे लक्ष्य होते. याकरिता ५६ लाखांच्या खर्चाची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येत आहे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणीपूर्ती करण्याचे आमचे लक्ष्य होते. याकरिता ५६ लाखांच्या खर्चाची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येत आहे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
ग्राम चंगेरा येथे ५६ लाख रुपये किमतीची पाणी पुरवठा योजना, ६ लाख रुपये किमतीचे सभामंडप व ३ लाख रुपये किमतीच्या मरघट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे होत्या. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सभापती रमेश अंबुले, जि.प. सभापती लता दोनोडे, उपसभापती चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, पं.स.सदस्य अनिल मते, देवेंद्र मानकर, लोकचंद दांदरे, राधेश्याम देवाधारी, तेजन बोरकर, पुष्पा ब्रम्हे, साहेब बोरकर, पुष्पा मरस्कोल्हे, आतिष रफिक खान, हमीद खान, गुड्डू खान, जयकुमार डहाट, मन्नुसार बोरकर, भाऊलाल बोरकर, चमरु डहाट, उपदेश डहाट, अनिमल डहाट, शिवशंकर गुप्ता, अनंतराम कोडवती, लालसिंग पंधरे, रामसिंग मरकाम, जयसिंग मरकाम, रफीक खान, आरीफ खान, हमीद दाऊद खान, इदरिस खान, चंदन बिजेवार, राधेलाल हिरवानी, विक्की नागवंशी, कैलास बोरकर, बाबू खान, धनीराम बिजेवार, प्रमेश बनकर व गावकरी उपस्थित होते.
आ. अग्रवाल पुढे म्हणाले, चंगेरा ग्राम मुस्लीमबहुल आहे. गेल्या काही वर्षात येथे मजारच्या समोर सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले. ते आता मांगलिक कार्याकरिता उपयोगी पडत आहेत. चंगेराकडून जाणारे चंगेरा-कोचेवाही, चंगेरा-बाजारटोला तसेच गोंदिया-बालाघाट या सर्व मार्गांच्या नूतनीकरण कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. रजेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या स्थापनेमुळे आरोग्य सेवा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे यांनी, कोचेवाही-परसवाडा मार्गावर नवीन पूल निर्माणची गोष्ट असो वा बनाथर-कोचवाही-चंगेरा मार्गाचे नवीनीकरण असो, आमदार अग्रवाल विकास कामे खेचून आणतात. त्यामुळेच परिसरातील विकास कामांना गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच, उपसरपंच यांचा काँग्रेस प्रवेश
या वेळी आमदार अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत चंगेराच्या सरपंच कांता डहाट व उपसरपंच आबीद खान यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार अग्रवाल यांनी सर्व अतिथींचे तसेच सरपंच कांता डहाट व उपसरपंच आबीद खान यांचे पुष्पगुच्छ देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल स्वागत केले.