पाईपलाईन फुटल्याने चार गावांचा पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:07 AM2021-07-13T04:07:00+5:302021-07-13T04:07:00+5:30
अर्जुनी मोरगाव : वडसा-कोहमारा मार्गावर सुरू असलेल्या निर्माणाधीन पूल बांधकामाचे वेळी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली. यामुळे चार गावांचा पाणीपुरवठा ...
अर्जुनी मोरगाव : वडसा-कोहमारा मार्गावर सुरू असलेल्या निर्माणाधीन पूल बांधकामाचे वेळी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली. यामुळे चार गावांचा पाणीपुरवठा गेल्या १२ दिवसांपासून बंद आहे. त्वरित पाईपलाईन दुरुस्ती करण्याची मागणी माजी जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी केली आहे.
वडसा- कोहमारा प्रमुख राज्य मार्ग ११ वर बाराभाटी नजीक पुलाचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. बांधकामाचे वेळी खांबी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे १६० एमएमचे लोखंडी पाईप फुटले आहेत. यामुळे सुकळी, खैरी, अरततोंडी व दाभना या चार गावांचा १ जुलैपासून पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे गावकऱ्यांना पाणीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. शिवालय कंपनीने ही पाईपलाईन त्वरित दुरुस्त करून देण्याची मागणी माजी जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी गोंदिया बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.
120721\img-20210712-wa0012.jpg
बांधकामात तुटलेली नळयोजनेची पाईपलाईन