पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन

By admin | Published: July 13, 2017 01:16 AM2017-07-13T01:16:20+5:302017-07-13T01:16:20+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यातील पुतळी येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्र मांतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या

Water supply scheme e-Bhumi Pujan | पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन

पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन

Next

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते : पालकमंत्र्यांशी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यातील पुतळी येथील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्र मांतर्गत सुरु करण्यात येणाऱ्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रिमोटद्वारे १० जुलै रोजी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानातून करण्यात आले.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणकर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव संतोषकुमार, वर्ल्ड बँकेचे टास्क टिम रिडर राहावा नीती उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात ई-भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पालकमंत्री बडोले म्हणाले, गोंदियासारख्या मागास जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पुतळी पाणी पुरवठा योजनेंतर्गत येणाऱ्या १६ गावांतील ग्रामस्थांची पाणी समस्याची सोडवणूक करण्यास या भूमिपूजनामुळे मदत होणार आहे. या गावातील नागरिक बऱ्याच दिवसांपासून शुध्द व स्वच्छ पाण्यासाठी व्याकूळ होते. आता या ई-भूमिपूजनामुळे पाण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ई-भूमिपूजन कार्यक्र माला जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता सतीश सुशीर, कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे, उपअभियंता प्रदिप वानखेडे, शाखा अभियंता निशीकांत ठोंबरे, उपअभियंता राजेश मडके, उप कार्यकारी अभियंता सारवी, सहायक अभियंता नगराळे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कृष्णा जनबंधू यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील विविध विभागातील १७१ पाणीपुरवठा प्रकल्पांचे एकाचवेळी ई-भूमिपूजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पाणी पुरवठा विभागाचे कौतुक केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, शुध्द पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. ग्रामीण भागाला पिण्याचे शुध्द पाणी देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्र मातून १००३ नळ पुरवठा योजना व ८३ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या पुनरुज्जीवनाची कामे हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेच्या कामाची किंमत ११ कोटी ३२ लाख ९० हजार रूपये इतकी आहे. ही पाणी पुरवठा योजना सुरु झाल्यानंतर दरडोई ५५ लिटर पाणी रोज उपलब्ध होणार आहे. या कार्यक्र मांतर्गत पुतळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे पुनरूज्जीवन करण्यात येणार आहे.

या गावांना मिळणार लाभ
पुतळी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा लाभ सडक-अर्जुनी तालुक्यातील १६ गावे व १८ वाड्यांंना होणार आहे. यामध्ये कोहलीपार, कन्हारपायली, सायलीटोला, पाटीलटोला, पाथरटोला, कोहमारा, बेघरटोली, कोयलारी, कोहळीटोली, मोहघाटा, पांढरवाणी, महारटोला, पुतळी, नरेटीटोला, रेंगेपार, कुलारटोला, मोकाशीटोला, कन्हारटोला, नवाटोला, बेघरटोला, उशीखेडा, सडक-अर्जुनी, दल्ली, लेंडीटोला, बोंडकीटोला, हलबीटोला, जीराटोला, सलंगटोला, डव्वा, घोटी, म्हसवाणी, चिरचाळी व गोंगले या गाव व वाड्यांना होणार आहे.

 

Web Title: Water supply scheme e-Bhumi Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.