३६ गावांचा पाणीपुरवठा आठवडाभरापासून बंद ; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:54 IST2025-01-23T15:53:43+5:302025-01-23T15:54:54+5:30

चार दिवस कामाला सुरुवातच नाही : पाणी पुरवठा विभाग उदासीन

Water supply to 36 villages has been cut off for a week; Citizens are desperate for water | ३६ गावांचा पाणीपुरवठा आठवडाभरापासून बंद ; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Water supply to 36 villages has been cut off for a week; Citizens are desperate for water

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यांतील ३६ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या गावांचा पाणी पुरवठा पाइपलाइन लिकेज झाल्याने १७ जानेवारीपासून ठप्प आहे. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.


बनगाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनला बोरकन्हार येथे गळती लागल्याने पाइप दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला. मंगळवारपासून कामाला सुरुवात करण्यात आली असल्याचे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. कधी वीजपुरवठा खंडित, कधी पाइपलाइनला गळती, कधी देखभाल दुरुस्तीचे कंपनीला पैसे दिले नाही अशा विविध कारणांमुळे बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद राहते. या योजनेला अविरत सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांचा आटापिटा असतो. त्यातच या योजनेचे शुद्ध पाणी घेणारे नळ कनेक्शनधारकही उदासीन आहेत. शुद्ध पाणी वापरतात, परंतु पाण्याचे बिल देण्यासाठी नळ कनेक्शनधारक धजावत नाही. 


३६५ पैकी ६५ दिवस योजना बंद 
बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नळकनेक्शनधारकांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. कधी वीज पुरवठा खंडित, तर कधी पाइपलाइनला गळती यामुळे ही योजना बंद असते. ३६५ पैकी ६५ दिवस ही योजना बंद राहत असल्याची कबुली विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


आज सायंकाळपर्यंत सुरू होणार पाणीपुरवठा 
योजनेचा विद्युत पुरवठा बंद झाला की याची माहिती दिली जाते. थकीत वीज बिलाचे नियोजन आधीच होणे अपेक्षित आहे. १७ जानेवारीपासून पाइपलाइनला गळती लागल्याने पाणीपुरवठा बंद असून गुरुवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल असे उपविभागीय अभियंता सतदेवे यांनी सांगितले.


योजनेच्या वीज बिलाची थकीत रक्कम किती 
या पाणीपुरवठा योजनेचे थकीत वीजबिल भरण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यासाठी ह्या योजनेचे पाणी वापरणाऱ्या गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना बनगाव पाणीपुरवठा या व्हॉटसअॅप ग्रुपवर जोडून त्यांच्यात सतत जनजागृती करणे अपेक्षित आहे. परंतु योजनेच्या बिलाची थकीत आकडेवारी पुढे येत नाही.

Web Title: Water supply to 36 villages has been cut off for a week; Citizens are desperate for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.