प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था
By admin | Published: May 8, 2017 12:52 AM2017-05-08T00:52:53+5:302017-05-08T00:52:53+5:30
जंगलातील पाण्याचे स्त्रोत संपल्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती होत असून अशात गावांत शिरतात व त्यांची शिकरही होते.
कुंभारटोली ग्रामवन समितीचा उपक्रम : प्राण्यांची भटकंती थांबली
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : जंगलातील पाण्याचे स्त्रोत संपल्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती होत असून अशात गावांत शिरतात व त्यांची शिकरही होते. हे प्रकार घडू नये यासाठी तालुक्यातील कुंभारटोली येथील ग्रामवन समितीने जंगलात चार ठिकाणी खड्डे खोदून वन्याप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.
रखरखत्या उन्हाळ्यात जंगलामध्ये वन्य प्राण्यांना तहान भागवण्यासाठी जंगल परिसरात पाणी न मिळाल्याने ते जंगला लगतच्या गावांमध्ये शिरतात. या वन्यप्राण्यांपासून गावकरी व जनावरांना धोका असतो तेथेच वन्यप्राण्यांची शिकार केली जात असल्याचेही प्रकार काही नवे नाहीत. हे बघून ग्रामवन समितीने जंगल परिसरात विविध ठिकाणी पाण्यासाठी जवळपास १० ते १२ फूट खोल चार खड्डे खोदून वन्य प्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून दिले.
जंगलातच पाणी उपलब्ध होत असल्याने वन्यप्राण्यांची तहान भागत असून त्यांचे गावांमध्ये शिरणे बंद झाले आहे. यासाठी समिती अध्यक्ष अशोक बोकडे, सचिव एस.एम.पवार, उपाध्यक्ष निरु फुले, सहसचिव प्रकाश बोम्बार्डे, विजय डोंगरे, संतोष वान्दे, कैलाश पतैह, भरत उईके, इनोर खोब्रागडे, मुकेश डोंगरे, रंजित गेडाम, ममता मेश्राम, रविता डोंगरे, सुषमा येटरे, अरुणा मेश्राम यांनी सहकार्य केले.