तहसीलदारांनी केले जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:00 AM2019-09-04T06:00:00+5:302019-09-04T06:00:19+5:30
धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर शासकीय जलपूजनाची प्रथा असल्याने मंगळवारी (दि.३) सकाळी १० वाजता तहसीलदार मेश्राम यांनी जलपूजन केले. तालुक्यातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा अशी जलदेवतेला मनोकामना केली. ओव्हरफ्लोमुळे पूर संभावित गावातील जनतेने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : सर्वदूर प्रसिद्ध असलेले इटियाडोह धरण तब्बल सहा वर्षांनंतर मंगळवारी (दि.३) सकाळी ४ वाजता ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून दोन इंच पाणी वाहत असल्याचे विहंगम दृश्य डोळ््यांचे पारणे फेडण्यासारखेच आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर शासकीय जलपूजन करण्याची येथे प्रथा आहे. त्यानुसार, तहसीलदार विनोद मेश्राम यांनी सकाळी १० वाजता शासकीय जलपूजन केले.
धरण ओव्हर फ्लो होण्याची पर्यटकांसह सर्वांनाच प्रतीक्षा असते. यावर्षी झालेल्या दमदार पर्जन्यवृष्टीमुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यापूर्वी सन २०१३ मध्ये धरणे ओव्हरफ्लो झाले होता. गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हरितक्र ांतीचे स्वप्न साकार करणारे इटियाडोह धरण केव्हा ओव्हरफ्लो होते याची शेतकºयांना आस असते. या धरणाच्या पाण्यामुळे शेतीला सिंचन होत असते. धरणात अधिकचा पाणीसाठा झाल्यानंतर दुबार धानपीक घेतले जाते. त्यामुळे शेतकरी वर्गातही आनंद व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर शासकीय जलपूजनाची प्रथा असल्याने मंगळवारी (दि.३) सकाळी १० वाजता तहसीलदार मेश्राम यांनी जलपूजन केले. तालुक्यातील शेतकरी सुखी व समृद्ध व्हावा अशी जलदेवतेला मनोकामना केली. ओव्हरफ्लोमुळे पूर संभावित गावातील जनतेने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी इटियाडोह पाटबंधारे विभागाचे उप विभागीय अभियंता दिपक भिवगडे, शाखा अभियंता हितेश लंजे, कालवा निरीक्षक एम. आर. ढोक, तलाठी पुंडलीक कुंभरे, विनोद राऊत, पतीराम राणे उपस्थित होते.
गावांना सर्तकतेचा इशारा
धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गाढवी नदी फुगते. त्यामुळे नदीकाठावरील गावांना पुराचा धोका संभवतो. पुष्पनगर (अ) व (ब), वडेगावबंध्या, बोरी, चिचोली, करांडली, खोकरी, दिनकरनगर, सावरी, खोळदा, जरु घाटा, सुरबन या गावांना अधिक भीती असते. प्रशासनाने तशा सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. ओव्हरफ्लो होताच पर्यटकांनी गर्दी केली होती. उत्सुकतेपोटी पर्यटक पाण्यात उतरतात अशावेळी दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.