वैनगंगेत पाणी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:51 PM2019-04-22T21:51:40+5:302019-04-22T21:52:12+5:30
गोंदिया शहराची तहान भागविण्यासाठी पुजारीटोली प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अखेर तालुक्यात दाखल झाले आहे. तालुक्यातील ग्राम तेढवा येथील नाल्याच्या बंधाऱ्यात हे पाणी अडले होते. मात्र हा बंधारा भरल्यानंतर हे पाणी पुढे जावून सोमवारी (दि.२२) सायंकाळी वैनगंगेला जावून मिळाले. त्यामुळे आता शहरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया शहराची तहान भागविण्यासाठी पुजारीटोली प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी अखेर तालुक्यात दाखल झाले आहे. तालुक्यातील ग्राम तेढवा येथील नाल्याच्या बंधाऱ्यात हे पाणी अडले होते. मात्र हा बंधारा भरल्यानंतर हे पाणी पुढे जावून सोमवारी (दि.२२) सायंकाळी वैनगंगेला जावून मिळाले. त्यामुळे आता शहरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीत मोजकाच पाणीसाठी उरला असून त्यातून एक-दोन दिवसच शहराला पाणी पुरवठा करता येईल. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पुजारीटोलाच्या पाण्याची मागणी केली व गुरूवारी (दि.१८) दुपारी ३ वाजतादरम्यान पाणी तेथून सोडण्यात आले.
९० किमी. चा हा प्रवास करीत पुजारीटोलाचे पाणी अखेर गोंदिया तालुक्यातील ग्राम तेढवा येथील नाल्यात पोहचले आहे. सोमवारी (दि.२२) सकाळीच पाणी नाल्यात पोहचले होते. मात्र या नाल्यातील बंधाऱ्यात पाणी अडून होते. हा बंधारा भरल्यानंतर पाणी पुढे निघणार होते व सायंकाळी बंधारा भरल्यानंतर पुजारीटोलाचे पाणी अखेर वैनगंगेच्या पात्रात शिरले.
पाणी तोंडावर येवून अडकून बसल्याने अधिकारीही हैरान झाले होते. मात्र सांयकाळी पुन्हा पाण्याने पुढचा प्रवास सुरू केला. अखेर सोमवारी सायंकाळी पाण्याचा हा प्रवास वैनगंगेत जावून संपला.