मेणाच्या कोटिंगचे सफरचंद ठरताहेत आरोग्यासाठी घातक

By admin | Published: May 8, 2017 12:58 AM2017-05-08T00:58:40+5:302017-05-08T00:58:40+5:30

जिल्ह्यात आंब्यांमध्ये व केळीमध्ये कॅल्शिअम कार्बाइडचा वापर करून लोकांना फळांद्वारे रोज मृत्यू विकले जात आहे.

Wax coatings are considered to be appetizing health hazardous | मेणाच्या कोटिंगचे सफरचंद ठरताहेत आरोग्यासाठी घातक

मेणाच्या कोटिंगचे सफरचंद ठरताहेत आरोग्यासाठी घातक

Next

मृत्यूची खाई : आकर्षणासाठी व्हॅक्सचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात आंब्यांमध्ये व केळीमध्ये कॅल्शिअम कार्बाइडचा वापर करून लोकांना फळांद्वारे रोज मृत्यू विकले जात आहे. चवदार टरबूजातही लाल रंगाचे रासायनिक पदार्थ इंजेक्शनने टाकून लोकांच्या जीविताशी रोज खेळ खेळल्या जात आहे. आरोग्याला पोषक असलेल्या सफरचंदमध्येही सहजतेने उपलब्ध होणाऱ्या चॉकलेटी मेनाचे कोटींग करून सफरचंदद्वारे घराघरांत विष पोहोचविण्याचा प्रकार सुरु आहे.
विशेषत: या सफरचंदला बाजारात मोठी मागणी असून हे फळ २०० ते ३०० रुपये किलोने विकले जात आहे. लालसर काळ्या रंगाचे सफरचंद जादा दिवस टिकावे, ते खराब होऊ नये, यासाठी या ठिकाणाहून सफरचंदचा स्टॉक गोंदिया येथे येतो. तेथूनच चॉकलेटी रंगाचा मेनाचा सफरचंदवर कोटींग केले जाते. मात्र नागरिकांना कल्पनाही नसेल, अशा प्रकारे आरोग्याला अत्यंत हानीकारक असलेले हे सफरंदला लावलेले मेन अनेक आजार बळावतात.
गोंदिया शहरात अनेक फळविक्रेते आहेत. शहराला फळांचा पुरवठा होतो. बाजारात अनेक प्रकारचे सफरचंद विक्रीस असून हे सफरचंद टवटवीत दिसण्यासाठी अनेक प्रकारची शक्कल फळविक्रेते लढवितात. यामध्ये फळांवर खासगी दुकानातून आणलेले स्टिकर लावून ते फळ कुठल्याही दर्जाचे असले तरी यूएसए व इतर देशातून ही फळे आली असल्याचे त्या स्टिकरवर नमूद असते. ही फळे बेभाव विकली जातात.

नियमित व्हॅक्स (मेन) लावलेली सफरचंद खाण्यात आल्यास रोगप्रतिकार शक्ती कमी होते. पोट दुखणे, लहान मुलांची वाढ खुंटने व काही कालावधीनंतर कर्करोगही होण्याची शक्यता असते.
सफरचंदामध्ये क जीवनसत्त्व
सफरचंदमध्ये क जीवनसत्त्व असते. तसेच त्यामध्ये डी कॉम्प्लेस ग्रुप असते. हे आहारात घेतल्याने आयर्न (लोह) मिळते. यामुळे शरीरात रक्तवाढीस मदत होते, असे डॉक्टरांचे मत आहे. जर फळे खायची असेल तर गरम पाण्याने वरील लेप धुऊन, पुसून काढावे. नंतरच ती फळे खावी.
आरोग्याला पोषक असलेली फळे घातक
सफरचंद मध्ये मानवी शरीराला आवश्यक असणारे सर्व घटक असल्यामुळे अनेक डॉक्टर रुग्णांना सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. परंतु कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या चॉकलेटी मेनाचा वापर करून ही फळे चमकवितात. त्यामुळे कर्करोगासारखे आजार रोज विकला जात आहे.
काश्मीरमधून येतात सफरचंद
काश्मीरातून सफरचंद येते. मात्र फळे विक्रेते स्थानिक पातळीवर स्टिकर लावून ते फळी विदेशातून आल्याचे सांगण्यात येते. दीर्घकाळ टिकावा म्हणून सफरचंदवर चॉकलेटी व्हॅक्स लावले जाते. रसायनिक प्रक्रियेतून तयार केलेले मेन आरोग्याला हानीकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Wax coatings are considered to be appetizing health hazardous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.