इंदिरा आवास पडण्याच्या मार्गावर
By admin | Published: April 7, 2016 01:56 AM2016-04-07T01:56:26+5:302016-04-07T01:56:26+5:30
घोगरा या गावी दारिद्र रेषेखालील गरीब व्यक्तींना शासनाने २० वर्षापूर्वी आठ इंदिरा आवास झोपड्या तयार करून दिल्या होत्या.
मुंडीकोटा : घोगरा या गावी दारिद्र रेषेखालील गरीब व्यक्तींना शासनाने २० वर्षापूर्वी आठ इंदिरा आवास झोपड्या तयार करून दिल्या होत्या. त्या झोपड्यांचे कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आले होते. पण यावेळी त्या झोपड्या पडण्याचा मार्गावर आहेत. त्यामुळे झोपड्यातील राहणाऱ्या व्यक्तींवर जीव गमविण्याची पाळी येण्याची दाट शक्यता आहे. परंतु त्यांचे कैवारी कोणीच दिसत नाही.
या जीर्ण असलेल्या झोपडयांची लेखी तक्रार खंडविकास अधिकारी तिरोडा यांच्याकडे केली आहे. पण ती तक्रार गेल्या सहा महिन्यांपासून धूळ खात आहे. त्या तक्रारींची कोणत्याच प्रकारची दखल घेतली गेली नाही. दारिद्रय रेषेखाली व्यक्तींनी तिरोडा येथे जावून विचारपूस केली असता तुमची फाईल गोंदिया येथे गेली आहे, असे सांगून वेळ घालवित आहेत.
या इंदिरा आवासमधील व्यक्ती, झोपड्या जीर्ण अवस्थेत असल्यामुळे आपल्या घरांच्या समोर पडवीत तर काही व्यक्ती मंडप घालून शेजारी राहत असतात.
वरील सिमेंटचे छत कोसळलेल्या अवस्थेत असून छतावरील पोपळे खाली पडत आहेत. तसेच लोखंडी सळाखे बाहेर निघालेल्या अवस्थेत दिसत आहेत. भिंतीना मोठमोठ्या भेंगा पडलेल्या दिसत आहेत. त्यामुळे साप व विंचू निघण्याची भीती निर्माण झालेली दिसत आहे. पण कैवारी कोणीही दिसत नाही.
सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून लवकरच पावसाळा सुरू होण्याची वेळ येणार आहे. पण त्या झोपड्या पावसाळ्यात केव्हा होणार, असा प्रश्न त्या इंदिरा आवासमधील व्यक्तींसमोर उभा आह. तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून नवीनच घरकूल देण्याची मागणी दारिद्र्यरेषेखालील आठ व्यक्तींनी केली आहे.
त्यामध्ये प्रकाश सहारे, रवी पालांदूरकर, अजय सहारे, सुनील भांडारकर, तुलसीदास मेश्राम, रविप्रकाश सोनेवाने, वासुदेव शेंडे, हरिदास मेश्राम यांचा समावेश आहे. (वार्ताहर)