उत्तम आरोग्य सेवेसाठी आम्ही कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 09:43 PM2018-02-25T21:43:36+5:302018-02-25T21:43:36+5:30
जेव्हा देशातील जनता स्वस्थ राहील, तेव्हाच देशाची प्रगती होणार. यामुळेच आम्ही आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा असल्याचे म्हणतो.
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : जेव्हा देशातील जनता स्वस्थ राहील, तेव्हाच देशाची प्रगती होणार. यामुळेच आम्ही आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा असल्याचे म्हणतो. यासाठीच आम्ही तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यात आम्हाला यश आले आहे. कारण, प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम मरारटोला (काटी) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ग्राम काटीचे सरपंच अशोक गोखले यांनी, सर्व सामान्या माणसाची समस्या जाणून त्याला सोडविणे हेच आमदार अग्रवाल यांच्या सारख्या लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. त्यांच्या या गुणांमुळेच क्षेत्रातील जनता त्यांना नेहमी आर्शिवाद देत असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, आरोग्य समिती सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, लता दोनोडे, शैलजा सोनवाने, चमन बिसेन, डुलेश्वरी लिल्हारे, भोजराज चुलपार, जिराबाई पंधरे, विमल नागपूरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनीता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, जिल्हा आरोग्य अधिकारी एस.डी.निमगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष नेवारे यांच्यासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते.