शेतकºयांच्या हितासाठी आम्ही लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 10:21 PM2017-10-24T22:21:33+5:302017-10-24T22:21:46+5:30
शाळेत विद्यार्थ्यांची पहिली यादी, दुसरी यादी लावून प्रवेश दिला जातो. तशी शेतकºयांची थट्टा करुन कर्जमाफीची यादी एक-एक प्रकाशित केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सरांडी : शाळेत विद्यार्थ्यांची पहिली यादी, दुसरी यादी लावून प्रवेश दिला जातो. तशी शेतकºयांची थट्टा करुन कर्जमाफीची यादी एक-एक प्रकाशित केली जात आहे. शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती का दिली जात नाही? पुढील हिवाळी अधिवेशनात ना. शरद पवार यांच्या नेतृत्वात शेतकºयांसाठी आम्ही रस्त्यावर येणार, शेतकºयांना न्याय मिळवून देणार, असे प्रतिपादन माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केले.
सार्वजनिक नवयुवक मंडळच्या सौजन्याने मंडईनिमित्त खोपडा येथे ‘उद्धवस्त झाला संसार’ न्यू भारत नाट्य कला रंगभूमी वडसानिर्मित तीन अंकी मराठी नाटिकेचे सादरीकरण खोपडा येथे जि.प. शाळेच्या पटांगणावर करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते.
उद्घाटक माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन, रंगमंच पूजक जया रामसागर धावडे तर अध्यक्षस्थानी माजी आ. दिलीप बन्सोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक रामसागर धावडे, तंमुस अध्यक्ष किशोर बावनकर, सरपंच संतोष बावनकर, उपसरपंच नामदेव आदमने, पोलीस पाटील प्रशांत हिरकणे, भागवत पाटील, श्यामकला भोंगाडे, जितेंद्र साठवणे, राजू धावडे, बाबुराव पाटील, शिवा जगनाडे, लिलाधर पाटील, रमेश भगत, जितू सोनवाने आदी उपस्थित होते.
यावेळी जया धावडे यांनीसुद्धा पं.स. क्षेत्रातील कामे करण्याचे आश्वासन दिले. संचालन शिवा जगनाडे यांनी केले. आभार प्रशांत हिरकणे यांनी मानले.
धादरी येथे मंडईनिमित्त कार्यक्रम
धादरी येथे दिवाळीनिमित्त मंडई-मेलाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त दिगंबर पाटील यांच्या घराजवळ संगीत खडा तमाशाचे सादरीकरण झाले. तमाशा कार्यक्रमाचे रंगमंच पूजन जया रामसागर धावे यांच्या हस्ते, उद्घाटक दिलीप बन्सोड यांच्या हस्ते, पंचम बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी रामसागर धावडे, संजय किंदरले, राजकुमार उके, भाष्कर पटले उपस्थित होते. संचालन अजित ठवरे व आभार डॉ. दिनदयाल पटले यांनी मानले.