कोरोनाशी युद्ध आम्ही जिंकणार पुरवणी (मजकूर)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:56+5:302021-05-10T04:28:56+5:30
सन २०२० पासून जगात कोरोनाने धुमाकूळ घातला. लोक भीतीने सैरभैर झाले. सगळे जनजीवन विस्कळीत झाले. लोकांची आर्थिक स्थिती डबघाईला ...
सन २०२० पासून जगात कोरोनाने धुमाकूळ घातला. लोक भीतीने सैरभैर झाले. सगळे जनजीवन विस्कळीत झाले. लोकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. छोटे व्यापारी, कारागीर, कामगार व्यापारी सारेच यात भरडल्या गेल्या. रोजगार नसल्यामुळे लोक चलबिचल झाले आहे. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. बेकारी निर्माण झाली. कोरोनामुळे एकाच कुटुंबातील काही व्यक्तींचा मृत्यू होतो तर दुसरीकडे सारे कुटुंब दवाखान्यात भरती होत आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी हेवेदावे विसरून माणुसकीच्या धर्माने एकमेकांना मदत केली पाहिजे. लोकांच्या हितासाठी राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे. लोकांनीही त्यांना साथ दिली पाहिजे. कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी शासन, अधिकारी वर्ग, महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य कर्मचारी फक्त यांचीच जबाबदारी आहे असे समजून चालणार नाही. ही जबाबदारी प्रत्येकाची आहे असे समजून सर्वांनी एकत्रित हातात हात घालून काम केले पाहिजे. तेव्हाच आपण म्हणू आम्ही लढणार... आम्ही जिंकणार. या महामारीच्या विरोधात सर्वांनी मिळून आपला लढा दिला पाहिजे. जिंकण्याकरिता आपल्याला लढावेच लागेल आणि परिस्थितीनुसार बदलावेच लागेल कारण परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे.
वर्क फ्रॉम होम
आज खासगी कंपन्या ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावावर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगारांसाठी ही उपाययोजना अमलात आणली आहेत. आश्चर्य वाटते ना? पण करोनाने हा प्रताप करून दाखविला आहे. महामारीच्या संकट काळात विविध अडचणींना सामोरे जणाऱ्या उद्योग विश्वाने ‘वर्क फ्रॉम होम’ ला आपलेसे केले आहे.‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना टेलीपर फॉर्मन्स पत्राच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या घरी त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी आर्टीफिशीयल इंटेलिजन्सद्वारे जोडल्या जाते. एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीच्या नियमांचा भंग केल्यास ताबडतोब त्याचा फोटो काढून पाठविण्यात येतो. त्यामुळे आपल्याला खोटे बोलता येत नाही. आता मोठमोठ्या कंपन्यांची कामे घरी बसूनच वर्क फ्राॅम होमद्वारे होत आहे.
ऑनलाईन शिक्षण प्रणाली
आज कोरोनाच्या प्रभावाने शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन आव्हान उभे राहिले आहे. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना ऑनलाईनच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन वाचन साहित्य, वर्तमानपत्रे, मासिके, स्पर्धात्मक परीक्षाचे मार्गदर्शन तसेच करिअर गायडन्स इत्यादी आधुनिक मानसिक समाधान करण्याची वेळ आली आहे. ए-resourser, websites, apps याद्वारे ऑनलाइन शैक्षणिक अभ्यासक्रम यात टूलची माहिती देणे आता गरजेचे आहे.
.........
ई-सामाजिक माध्यमे :- १.फेसबुक, २. टिव्टर, ३. लिंकेडीन, ४. प्रिटेरेस्ट, ५. इंस्टाग्राम, ६. क्लीकर, ७. गुगल डॉक्स, ८. रिसर्च गेट, ९. व्हॉट्सॲप, १०. यू-ट्यूब, ११. स्लाईड शेअर, १२. लाईव्ह जर्नल, १३.क्लॉज, १४. पिक्की.
सेल्फ लर्निंग अप्लीकेशन :- गुगल क्लासरूम, गुगल फार्म, झूम अॅप, टेलीग्राम अॅप, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ई-मेल या माध्यमाच्या आधारे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मोबाईलच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले जाऊ शकते. तसेच कोणत्याही वाचन साहित्याची आवश्यकता असल्यास त्यांना अनेक समाजमाध्यमे व सर्च इंजिनची माहिती करून दिली जाते.
सर्च इंजिन :- १. गुगल, २. याहू, ३. गुगल स्कॉलर, ४.ममा, ५. अल्टा-बिस्टा, ६. लायकॉस, ७. डॉपाईल, ८. हॉट-बॉट, ९. गुगल बुक्स, १०. गुगल अलर्टस, ११. गुगल इमेज, १२. पब मेड, १३. वर्ल्ड कैट अशा अनेक प्रकारच्या आधुनिक इंजीनच्या माध्यमातून विद्यार्थी आपले वाचन साहित्य, संशोधनात्मक माहिती, जर्नल किंवा त्यांना महत्त्वाची असलेली माहिती घरबसल्या शोध घेऊन आपली गरज पूर्ण करू शकतात. तसेच मानव संसाधन व भारत सरकार यांच्यातर्फे ई-संसाधने उपलब्ध करून दिली आहे.
१. नॅशनल डिजिटल लायब्ररी, २. इन्फिन्बफिनेट, ३. ई-पीजी पाठशाला, ४. शोधगंगा, ५. स्वयंप्रभा, ६. विद्वान, ७. शोधगंगोत्री.
या सर्व संकेतस्थळावर ऑनलाईन वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सध्या तरी ऑनलाईन शिक्षणप्रणालीशिवाय पर्याय शिल्लक उरलेला नाही.
......
लॉकडाऊनमुळे विवाह सोहळ्याचे स्वरूप बदलले
विवाह समारंभ मोठ्या थाटामाटात करण्याची पद्धत होती. काही नागरिक विवाहाला प्रतिष्ठा मानून लाखो रुपये विवाह समारंभासाठी खर्च करायचे. वेळ पडल्यास उधार, उसणे, कर्ज अथवा शेती किंवा घर गहाण ठेवून आपला सामाजिक दर्जा श्रेष्ठ कसा आहे, ही दाखविण्याचा आटापिटा करायचे. परंतु कोरोनाने ही सर्व समीकरण बदलवूनच टाकली. ५० वऱ्हाड्यांच्या उपस्थित विवाह सभारंभाला परवानगी दिली आहे. भारतीय साथ रोग अधिनियम १,८९७ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ फौजदारी दंड संहिता १९७३ अन्वये आरोग्य विभागाद्वारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता अनेक गोष्टींवर निर्बंध घातले आहे. लॉकडाऊनमुळे मानवाच्या गरजा कमी झाल्या भव्यतेकडून लघुतमतेकडे वाटचाल होणार आहे. नवीन पिढीचा लग्नसभारंभाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार, कुटुंब निर्मितीसाठी विवाह आवश्यक आहे. मुलांचे संगोपन, आर्थिक सहकार्य यासाठी विवाह गरजेचे आहे. यासाठी मोठा थाटमाट करून प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करून अर्थ नाही. या गोष्टीचा विचार व्हायला सुरुवात झाली आहे आणि नवीन पिढीने बदलत्या विवाहसभारंभाला मान्य केले आहे. सध्या तरी ५० व-हाड्यांसोबत लग्नसभारंभ होत आहे आणि आटोपल्या जात आहे. आता समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, याचा विचार कोरोनाने दूर ठेवला आहे.
....
मंदिरे व प्रार्थनास्थळांवर परिणाम
लॉकडाऊनमुळे देशाच्या अनेक राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. मंदिरामध्ये गर्दी केल्यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, अशी भीती मनात ठेवून त्याची खबरदारी घेण्याकरिता मंदिराला टाळे लावण्यात आले. त्याकरिता घरी राहूनच आपण आपली व दुसऱ्याची सुरक्षा करा हे सांगण्याची वेळ कोरोनामुळे आली आणि पाहता-पाहता भारतातील सर्व मंदिरे व प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. जगभर कोरोनाचे संकट असल्यामुळे हज यात्राही आवरती घ्यावी लागली.
कोरोना निसर्गासाठी वरदान
कोरोना व्हायरस माणसासाठी जरी घातक ठरला असला तरी निसर्गासाठी वरदान ठरला आहे. जगभराच्या लॉकडाऊनमध्ये दळणवळणाच्या साधनांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे विमाने, कार, बसेस, ट्रक, रेल्वे हे एका जागी ठप्प झाले होते. आणि आताही काही प्रमाणातच वाहतूक आहे. परिणामत: कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण एकाएकी कमी झाले. नद्यांचे पाणी स्वच्छ आणि शुद्ध झाले. ग्लोबल वाॅर्मिंगवर जगात बरीच चर्चा झाली. कोरोना व्हायरसमुळे अनेक परिवर्तने घडवून आणण्यास भाग पाडले हे नाकारता येत नाही.