उपवर-वधूंचा संवादातून तुटतात लग्न
By Admin | Published: April 22, 2016 03:37 AM2016-04-22T03:37:22+5:302016-04-22T03:37:22+5:30
सात जन्माचे स्वप्न पाहणाऱ्या उपवधूंचा संसार थाटण्यापूर्वीच उद्धवस्त झाला आहे. सातजन्माचे स्वप्न रंगविणाऱ्या त्या
ओ.बी.डोंगरवार ल्ल आमगाव
सात जन्माचे स्वप्न पाहणाऱ्या उपवधूंचा संसार थाटण्यापूर्वीच उद्धवस्त झाला आहे. सातजन्माचे स्वप्न रंगविणाऱ्या त्या जोडप्यांवर हुंडा तर काहींवर गैरसमजूतीमुळे लग्नमोडण्याची पाळी आली आहे. परिणामी सहा वर्षात गोंदिया जिल्ह्यातील ४० तरूणींचे लग्न मोडले आहे.
समाजातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत मोबाईल पोहचला आहे. पहिल्यांदा मुलाने मुलीला पाहिल्यावर तरूणी मनात ठसताच मुलगा मुलीचा मोबाईल नंबर घेतो. यातच त्यांचे बालणे होते. समाजातील जेष्ठ नागरिकांच्या मदतीने त्यांचे लग्न जुळÞून बोलणे अधिकच वाढते. बोलता- बोलता त्या दोघांमध्ये नको त्या गप्पा मारल्या जातात. यातच ते एकमेकांना त्यांच्या शैक्षणिक जीवनातील माहिती देतात. तुला आवडणारा मुलगा कोण होता इथपासून मुलगा विचारतो. तर मुलगीही तुमची प्रियसी होती का यापासून विचारणा करीत असते. यातून त्या दोघांचे संभाषण मध्यरात्री पर्यंत चालते. दररोज बोलण्याचा एकच उपक्रम असल्यामुळे अधिक बोलणार तरी का यातून ते बोलता-बोलता एकमेकांवर आरोप करू लागतात. अशातच त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. किंवा एकमेकांचे अफेयर माहिती पडले की लग्न मोडण्यापर्यंत दोघांची मजल जाते. प्रकरण मोठे झाले की लग्न मोडले जातात. परंतु या प्रकरणाला मुलीकडील मंडळी हुंडा मागीतल्याच्या कारणावरून त्यांना तुरूंगात टाकतात. लग्न मोडण्याचे कारण कोणतेही असो लग्न हुंड्यामुळे मोडले हीच प्रचलीत प्रथा समाजात आहे. हुंडाबंदी कायदा कलम ४,५ चा वापर होत असतो. लग्न मोडण्यासाठी सर्वात प्रथम कारण मोबाईलवर त्या दोघांचे होणारे संभाषण. त्यानंतर लग्न मोडण्याला दुसरे महत्वाचे कारण म्हणजे समाजातील काही समाजकंटक उपवराच्या विरोधात मुलींच्या नातेवाईकांना किंवा वधूच्या विरोधात मुलाकडील मंडळींना चुकीची माहिती देऊन त्यांचे लग्न मोडण्यात महत्वाची भूमिका बजावतात. परंतु चुकीची माहिती देणाऱ्यांची शहानिशा व दिलेली माहिती योग्य की अयोग्य याची शहानिशा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणे चुकीचे आहे. समाजकंटक कुणाचे भले होतांना पाहू शकत नाही ते मुलगा किंवा मुली संदर्भात चुकीची माहिती पसरवून त्यांचा संसार उध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. असे समाजकंटक दोन्ही पक्षाच्या समोर आले तर त्यांना सामूहिक मार खावा लागतो. संशयाची सुई लोकांच्या जीवनात टाकण्यासाठी ग्रामीण भागात असे समाजकंटक अनेक आहेत. लग्नाच्या पूर्वीच एकमेकांच्या चारित्र्यावर संशय निर्माण होत असल्यामुळेही लग्न मोडतात. अश्या विविध कारणामुळे लग्न मोडले तरे त्याला हुंड्याचे स्वरूप देऊन मुलांना अडकविण्याचा प्रयत्न मुलीकडील मंडळी करीत असतात. गोंदिया जिल्ह्यात सन २०१० ते एप्रिल २०१६ पर्यंत ४० तरूणींचे लग्न मोडल्याची नोंद घेण्यात आली आहे.