काेराेनामुळे निवडक लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:29 AM2021-04-27T04:29:48+5:302021-04-27T04:29:48+5:30
बिरसी फाटा : कोरोना संक्रमणाचा वाढता आलेख पाहता, अनेक विवाहसोहळे रोखले आहेत, तर काही ठिकाणी नियमांचे पालन करून विवाह ...
बिरसी फाटा : कोरोना संक्रमणाचा वाढता आलेख पाहता, अनेक विवाहसोहळे रोखले आहेत, तर काही ठिकाणी नियमांचे पालन करून विवाह सोहळे आटोपले जात आहेत, तर अनेकांनी कोरोनाचा संसर्ग पाहता, लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या आहे. एकंदरीत कोरोना कालावधीत लग्न समारंभातील बेडेजावपणालाही बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे गर्दी होणारे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे, तर लग्न सोहळेही २० ते २५ लोकांच्या उपस्थित पार पाडण्याचे निर्देश शासनाचे आहे. यामुळे बरेच जण या नियमांचे पालनही करीत आहे. काही जण नियोजित तारखेचे लग्न रद्द करून ते पुढे ढकलत आहे, तर काही जण अजूनही लग्नसोहळे आयोजित करीत आहे. कोरोना गाइड लाइन लक्षात ठेवा, पाहुण्यांना बोलविण्याची तयारी सुरू आहे. नातेवाइकांना बोलाविले जात आहे.
लॉकडाऊनमध्ये निर्बंध नसल्यामुळे आयोजन करणे फारच अवघड झाले आहे. कपडे, कटलरी, भांडी, टेलर्स, सराफा इत्यादी दुकानांना आवश्यक वस्तू मिळत नाहीत. बरेच लोक लग्नाची परवानगी घेण्यास संकोच करतात, केवळ शहरातच नाही, तर ग्रामीण भागात कोरोना संसर्गामुळे केवळ २५ लोकांना लग्नात जाण्याची परवानगी आहे. लग्न सोहळा २ तासांत पूर्ण होणे आवश्यक आहे. अशा सूचनाही या आहेत. उल्लंघन केल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा वाढत्या संक्रमणामुळे या वर्षी विवाहांची संख्या कमी झाली आहे. ग्रामीण भागात निश्चित विवाह ठरविले जात आहेत. या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.