विवाह सोहळे सामाजिक एकतेला पोषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:59 AM2018-04-14T00:59:14+5:302018-04-14T00:59:14+5:30
सामुहिक विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने समाजातील सर्व लोक एकत्रित येवून त्यांच्यात आपुलकी व स्नेह वाढते. यातूनच समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते. त्यामुळे सामुहिक विवाह सोहळे सामाजिक एकतेला पोषक ठरत असून अशा आयोजनांसाठी समाजातील जबाबदार लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ......
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सामुहिक विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने समाजातील सर्व लोक एकत्रित येवून त्यांच्यात आपुलकी व स्नेह वाढते. यातूनच समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते. त्यामुळे सामुहिक विवाह सोहळे सामाजिक एकतेला पोषक ठरत असून अशा आयोजनांसाठी समाजातील जबाबदार लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
तालुक्यातील ग्राम हलबीटोला येथे हलबी-हलबा समाजाच्यावतीने आयोजीत सामुहिक विवाह सोहळयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.एन.डी.किरसान होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री भरत बहेकार, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव सहषराम कोरोटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रावण राणा, महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे, नगर पंचायत उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई, भाजप महामंत्री राजेंद्र बडोले, पंचायत समिती सभापती अर्चना राऊत, विवाह समितीचे अध्यक्ष मुलचंद गावराणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर बिरसा मुंडा आणि राणी दुर्गावती यांच्या छायाचित्राला अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी आ. पुराम यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले विचार मांडताना सामुहिक विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे सांगून यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैशांचा अपव्यय थांबतो व कर्जबाजारीपणापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष मुलचंद गावराने यांनी मांडले व दरवर्षी होणाऱ्या हलबा हलबी समाजाच्या सामुहिक विवाह सोहळ््याचा आढावा सादर केला.
संचालन राजेश भोयर यांनी केले. कार्यक्रमासाठी समितीच्या सर्व पदाधिकाºयांनी सहकार्य केले.
जोडप्यांना भेट वस्तुचे वाटप
हलबा-हलबी समाजाच्यावतीने आयोजीत या सामुहिक विवाह सोहळ्यात आठ जोडप्यांना परिणय सुत्रात बांधण्यात आले. यानंतर समितीच्या वतीने या जोडप्यांना भांडी व इतर भेट वस्तु आ. पुराम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. परिणयबद्ध झालेल्या या जोडप्यांना आर्शिवाद देण्यासाठी मोठ्या संख्येत हलबा-हलबी समाजबांधव उपस्थित होते.