९ कर्मचाऱ्यांवर आरोग्य केंद्राचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:07 PM2019-01-24T22:07:02+5:302019-01-24T22:08:23+5:30

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २८ पदे मंजूर आहेत. मात्र रिक्त पदे भरण्यात आली नसल्याने ९ कर्मचाऱ्यांवर संपूर्ण आरोग्य केंद्राचा भार आला आहे. त्यामुळे आरोग्य केंद्र सलाईनवर असून आरोग्यसेवा खोळंबली आहे.

The weight of 9 health workers center | ९ कर्मचाऱ्यांवर आरोग्य केंद्राचा भार

९ कर्मचाऱ्यांवर आरोग्य केंद्राचा भार

Next
ठळक मुद्देगोठणगाव आरोग्य केंद्र : केंद्रात २८ पदे मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोठणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण २८ पदे मंजूर आहेत. मात्र रिक्त पदे भरण्यात आली नसल्याने ९ कर्मचाऱ्यांवर संपूर्ण आरोग्य केंद्राचा भार आला आहे. त्यामुळे आरोग्य केंद्र सलाईनवर असून आरोग्यसेवा खोळंबली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सन २०१७-१८ मध्ये आरोग्य केंद्रातील २८ मंजूर पदांपैकी १८ पदे भरण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये डॉ. खोब्रागडे व डॉ. बघेले यांची बदली करण्यात आली. त्यामुळे डॉ. आशिष बोदेले यांच्यावर ३ उपकेंद्र व ओपीडीची जबाबदारी आली. त्यातच शासकीय काम, कार्यालयीन सभा, शालेय आरोग्य तपासणी इत्यादी कामांचा भार वाढला. परिणामी, रुग्णांना आरोग्य सेवा देणे कठीण झाले. प्रयोशाळा तंत्रज्ञ व औषध निर्माण अधिकारी यांची सुद्धा बदली करण्यात आली. यामुळे तपासणी व औषध वितरण सेवा कोलमडली व एका आरोग्य सेवीकेवर औषध वितरणाचे काम आले आहे. ५ अंशकालीन आरोग्य सेविकांची नियुक्त सुद्धा करण्यात आली नाही.
केंद्रातील तीन उपकेंद्र वाऱ्यावर
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गोठणगाव, प्रतापगड व बाराभाटी उपकेंद्र येतात. बाराभाटी उपकेंद्रामध्ये डॉ. बघेले होते. त्यांची बदली झाल्याने जागा रिक्त आहे. शिवाय, शासनाकडून औषध पुरवठा नसून रुग्णांना वंचीत राहावे लागत आहे. प्राथमिक आरोग्य समितीच्या अध्यक्ष जि.प.सदस्य रचना गहाणे आहेत. त्यांना आरोग्य केंद्राकडे लक्ष केंद्रीत करुन रिक्त असलेले पद भरण्याची व औषध पुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: The weight of 9 health workers center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.