वृक्षदिंडीचे शहरात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:16 PM2019-06-29T22:16:57+5:302019-06-29T22:17:17+5:30
येथील पंचायत समिती कार्यालयाजवळ वृक्ष दिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यापूर्वी वनविभाग कार्यालयाजवळ रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : येथील पंचायत समिती कार्यालयाजवळ वृक्ष दिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यापूर्वी वनविभाग कार्यालयाजवळ रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वृक्षदिंडीचे संयोजक आशिष वांदिले, सचिव प्रशांत कामडे, सहसंयोजक विनोद अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, जिल्हा उपाध्यक्ष रेखलाल टेंभरे, नगराध्यक्ष आशिष बारेवार, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, किशोर पाटील, सुरेश सेवई, तालुका अध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, रचना गहाणे, सिता रहांगडाले, चित्रलेखा चौधरी, रेवेंद्रकुमार बिसेन, हिरालाल रहांगडाले, पुष्पराज जनबंधू, सुरेश रहांगडाले, एसीएफ शेंडे, एसीएफ शेख, वनपरिक्षेत्राधिकारी प्रविण साठवणे, रवी भगत, योगेश बंग राकेश ब्राम्हणे उपस्थित होते.
वृक्षदिंडीचे सचिव प्रशांत कांबळे यांनी, वृक्ष पाणी, सावली व औषध देते आणि सरतेशेवटी वृक्ष सरणालाही कामात येते या आशयाची कविता सादर करुन वृक्षदिंडीचे महत्व पटवून केले. तसेच प्रत्येकाला वृक्ष लावण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक वनविभागाचे सुरेश रहांगडाले यांनी मांडले. संचालन रेखलाल टेंभरे यांनी केले. आभार पुष्पराज जनबंधू यांनी मानले.
एक झाड लावून वृक्षारोपणाला सुरुवात
वृक्ष दिंडीचे तहसील कार्यालयाजवळ स्वागत करून पाहुण्यांच्या हस्ते एक झाड लावून वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी वनविभागाचे कर्मचारी, तहसीलदार शेखर पूनसे, खंडविकास अधिकारी सतीश लिल्हारे, निसर्ग मंडळाचे सदस्य अंकीत रहांगडाले, गुड्डू कटरे, अमित रहांगडाले40, नितीन बारेवार, विकास बारेवार, मोरेश्वर रहांगडाले उपस्थित होते.