गुरुनानकदेव प्रकाश यात्रेचे तिरोड्यात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 09:35 PM2019-06-15T21:35:19+5:302019-06-15T21:35:32+5:30

जगात शांतीचा संदेश पोहोचविणारे श्रीसंत गुरुनानकदेव यांच्या परंपरेला ५५० वर्ष पूर्ण झाले असून हाच शांतीचा संदेश सर्व मानवजातीला व्हावा देण्यासाठी ५५० साल गुरुनानकदेव प्रकाश यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेचे शुक्रवारी तिरोडा येथे आगमन झाले.

Welcome to Gurunanakdev Prakash Yatra | गुरुनानकदेव प्रकाश यात्रेचे तिरोड्यात स्वागत

गुरुनानकदेव प्रकाश यात्रेचे तिरोड्यात स्वागत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : जगात शांतीचा संदेश पोहोचविणारे श्रीसंत गुरुनानकदेव यांच्या परंपरेला ५५० वर्ष पूर्ण झाले असून हाच शांतीचा संदेश सर्व मानवजातीला व्हावा देण्यासाठी ५५० साल गुरुनानकदेव प्रकाश यात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेचे शुक्रवारी तिरोडा येथे आगमन झाले. या यात्रेचे स्वागत स्थानिक युनियन बँक चौकात आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, उमाकांत हारोडे, सतिश बेलानी, हरि बेलानी, डॉक्टर बेलानी, रामकुमार असाटी यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
यावेळी समाजबांधवांनी रस्ता स्वच्छ व फुलांचा वर्षाव करुन स्वच्छतेचा व शांतीचा संदेश दिला. तर यात्रेतील बांधवांसाठी थंड पाणी व शरबतची व्यवस्था करण्यात आली. यात्रेचे स्वागत रानी अवंतीबाई चौकात मंत्री भवन समोर करुन आईस्क्रीम व शरबतचे वितरण करण्यात आले. यात्रा पुढे सिंधी कॉलनी येथील गुरुद्वारा येथे गेली.तिथून समोरील स्थळी प्रस्थान झाली. यात्रेत २०-२२ गाड्यांचा ताफा असून काही गाड्या सजविलेल्या होत्या. यात्रेचे स्वागत व व्यवस्था यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांनी, स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनी सहकार्य केले.

Web Title: Welcome to Gurunanakdev Prakash Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.