नवीन जिल्हा पोलीस अधीक्षकांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 09:57 PM2018-08-06T21:57:54+5:302018-08-06T21:58:10+5:30

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध विषय तसेच पोलीस पाटलांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.

Welcome to the new District Superintendent of Police | नवीन जिल्हा पोलीस अधीक्षकांचे स्वागत

नवीन जिल्हा पोलीस अधीक्षकांचे स्वागत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुरदोली : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध विषय तसेच पोलीस पाटलांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
शिष्टमंडळामध्ये राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर, जिल्हा अध्यक्ष दिलीप मेश्राम, उपाध्यक्ष रमेश टेंभरे, जिल्हा सचिव राजेश बंसोड, कोषाध्यक्ष श्रीराम झिंगरे, महिला जिल्हाध्यक्ष नंदा ठाकरे, उपाध्यक्ष अनिता लंजे, खेमेश्वरी बोळणे, वनिता वाघमारे, चंद्रकांत भांडारकर, वनमाली मंडल, लोकचंद भांडारकर, पोमेश कटरे, प्रकाश कठाणे, प्रेमलाल टेंभरे, महेंद्र डोंगरे, देवेंद्र भांडारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्ह्यातील घडलेल्या घडामोडींसंदर्भात भृंगराज परशुरामकर यांनी सामाजिक व भौगौलिक परिस्थितीवर चर्चा केली. तसेच पोलीस पाटील संघटना राज्य स्तरावर असून त्यांच्यामार्फत जिल्हा व उपशाखा कार्य करते. प्रत्येक पोलीस ठाण्यात दर महिन्याला आढावा सभा घेण्यात येते व गावातील सर्व घडामोडींची माहिती देण्यात येते. जिल्ह्यातील पोलीस पाटलांना आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याने जिल्हास्तरावर कार्यशाळा घेण्यात यावी, असेही सांगितले.
जिल्हास्तरावर पोलीस पाटील सभा भवनाची आवश्यकता असल्याने ते कसे तयार करता येईल. या संदर्भात चर्चा करुन ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात लवकर सभा भवन तयार करता येईल, असे आश्वासन पोलीस अधीक्षक बैजल यांनी दिले.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक बैजल यांनी, पोलीस पाटील हे प्रशासनाचे डोळे, नाक, कान आहेत. त्यांच्याच मदतीने आम्हाला काम करावे लागते. जिल्ह्यातील पोलीस पाटील संघटनेच्या स्तुत्य उपक्रमांची प्रशंसा केली. तसेच यापूर्वीचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांना सहकार्य करुन शासनाच्या कामात मदत केली. तसेच आम्हाला पण सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.
याप्रसंगी पोलीस पाटील नानाजी पेंदाम, सिध्दार्थ वासनिक, राजेंद्र बडोले, विलास साखरे, मेघशाम मेंढे, अशोक बोळणे, सकुंतला पातोडे, भारती रामटेके, गजभिये, हेमंत नागपुरे, दिपक शामकुवर, रामकृष्ण लांजेवार, कापसे, रविंद्र क्षिरसागर यांचीसुद्धा उपस्थिती होती.

Web Title: Welcome to the new District Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.