स्वागताधिकारी कार्यालय ठरले शोभेचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:49 PM2019-08-18T23:49:36+5:302019-08-18T23:50:10+5:30

येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलाची जवाबदारी सांभाळण्यासाठी असलेले स्वागताधिकारी कार्यालय शोभेची वास्तू ठरत आहे. येथे लॉगहट विश्रामगृहाच्या देखभालीसाठी वन्यजीव विभागाच्या ११ कर्मचाºयांची फौज तैनात आहे.

Welcome office becomes a decoration | स्वागताधिकारी कार्यालय ठरले शोभेचेच

स्वागताधिकारी कार्यालय ठरले शोभेचेच

Next
ठळक मुद्देगरज नसतानाही क र्मचाऱ्यांची फौज : कर्मचाऱ्यांच्या पगारावर नाहक कोट्यवधींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलाची जवाबदारी सांभाळण्यासाठी असलेले स्वागताधिकारी कार्यालय शोभेची वास्तू ठरत आहे. येथे लॉगहट विश्रामगृहाच्या देखभालीसाठी वन्यजीव विभागाच्या ११ कर्मचाºयांची फौज तैनात आहे. यातून स्वागताधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर वेतनासह वर्षाला कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होत आहे. पर्यटन संकुलाचीच दुरवस्था झाल्याने या कार्यालयाचा अट्टाहास कशाला? असा प्रश्न नवेगावबांध फाऊंडेशनचे उपस्थित केला आहे.
या पर्यटन संकुल परिसरात सन १९७५ ते १९९१ पर्यंत प्राणी संग्रहालय व त्यानंतर अनाथालय अस्तित्वात होते. सन १९९१ नंतर या अनाथालयातील प्राण्यांची सुटका करुन त्यांना राखीव जंगलात सोडण्यात आले. सन २०१२ पर्यंत या अनाथालयात दोन बिबट असल्याने चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. सन २०१२ नंतर वन्यजीव संरक्षण विभागाने पर्यटन संकुल परिसरातील लॉगहट विश्रामगृह वगळून डॉरमेंट्री, हॉलीडे होम, प्राणी अनाथालय परिसर, संजयकुटी विश्रामगृह, हिलटॉप गार्डन, बालोद्यान, तंबू निवास, मनोहर उडान हे सर्व वनविकास महामंडळाला हस्तांतरित केले.
त्यामुळे सन २०१२ नंतर वन्यजीव संरक्षण विभागाकडे एकमेव लॉगहट विश्रामगृह उरले होते. त्यामुळे इतके कर्मचारी व एका स्वतंत्र कार्यालयाची गरजच काय? असे म्हणण्याची पाळी आता आली आहे. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काही कामच नसल्यामुळे सुस्त झाले असून स्वागताधिकारी कार्यालय शोभेचा पांढरा हत्ती ठरला आहे. दुसरीकडे वन्यजीव संरक्षण विभागाच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या राष्ट्रीय उद्यान संरक्षीत विभागात अनेक पदे रिक्त आहेत. तेथील कार्यरत कर्मचारी व अधिकाºयांना अतिरिक्त कार्यभार सांभाळतांना तारेवरची कसरत करावी लागते.
तर एक स्वागताधिकारी, दोन वनरक्षक, एक स्वयंपाकी, दोन माळी व चार चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्या वेतनावर वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुन यांचे लाड पुरविले जातात. यावर फाऊंडेशनने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. एक बालोद्यान सोडले तर संपूर्ण पर्यटन संकुलाची दुरवस्था झाली आहे. शासन कर्मचाºयांच्या पगारावर कोट्यावधींचा खर्च करतो तर विकासाकडे दुर्लक्ष होत आहे.

या कार्यालयाद्वारे विश्रामगृहाची डागडुजी करणे, संजयकुटी डॉरमेंट्री व लॉगहट या विश्रामगृहांचे आॅफलाईन बुकींग करणे तसेच या कार्यालयातील कर्मचाºयांचे वेतन काढणे एवढेच काम आहे. विश्रामगृहाच्या डागडुजीचे कामही आता राष्ट्रीय उद्यान (संरक्षण) विभागच करीत आहे.
सदानंद अवगान
वनक्षेत्राधिकारी, स्वागताधिकारी कार्यालय राष्ट्रीय उड्डान पर्यटन संकूल नवेगावबांध

Web Title: Welcome office becomes a decoration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.