लोखंडी कटघरे करतात प्रवाशांचे स्वागत

By admin | Published: September 22, 2016 12:44 AM2016-09-22T00:44:04+5:302016-09-22T00:44:04+5:30

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे.

Welcome passengers to iron bars | लोखंडी कटघरे करतात प्रवाशांचे स्वागत

लोखंडी कटघरे करतात प्रवाशांचे स्वागत

Next

ड्रामाची मागणी : बंद लोखंडी गेट सुरू करा
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे. परंतु रेल्वे स्थानकावर प्रवेश करण्यासाठी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोखंडी कटघरे व बंद असलेल्या लोखंडी गेट यामुळे प्रवाशांना लांब अंतर पायी चालत जावून स्थानकात प्रवेश करावा लागतो.
गोंदिया रेल्वे स्थानकात दरवर्षी कोट्यवधी रूपयांच्या तिकिटा विक्री होतात. लाखो रूपये विशेष तपास अभियानांतर्गत रेल्वेला उपलब्ध होतात. परंतु प्रवासी सुविधांच्या नावावर अडचणी तयार करण्यात रेल्वेचे अधिकारी कुशल आहेत, असा आरोप ड्रामाने (डेल्वी रेल्वे मुव्हर्स असोसिएशन) केला आहे.
बाजारा परिसराच्या रेल्वेच्या मुख्य प्रवेशद्वाराला लोखंडी पाईपने बेरिकेटिंग करण्यात आले आहे. चारही बाजूंना लोखंडी मोठमोठे पाईप लावून अडचणी निर्माण केल्या आहेत. गोंदियामध्ये लोखंडी गेट लावून कार, आॅटो, रिक्षा व इतर प्रवासी वाहनाने आपले लगेज घेवून पोर्चपर्यंत जावू दिले जात नाही. गोंदियात लोखंडी बेरिकेट्सशिवाय मोठे लोखंडी गेट लावण्यात आले आहेत. हे गेट नेहमीच बंद असतात. वृद्ध, महिला व बालकांना पोर्चपासून दूर अंतरावर उतरावे लागते. तसेच धावत जावून व पाईपवरून उडी घेवून आपला लगेज घेवून जावे लागते. जर पाऊस येत असेल तर आणखी समस्या उत्पन्न होते. अनेकदा रेल्वे अधिकारी व संसद सदस्यांना याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. परंतु त्यांनी लक्ष न दिल्याने जनतेला समस्या सहन करावी लागत आहे.ड्रामाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, अशोक शर्मा, कोषाध्यक्ष जितेंद्र परमार, रेल्वे कमिटी सदस्य मेहबूब हिराणी, चंद्रकांत पांडे, प्रकाश तिडके, प्रमोद सचदेव, विष्णू शर्मा यांनी रेल्वे प्रशासनाला पुन्हा निवेदन दिले आहे. त्यात दोन्ही लोखंडी गेट मार्गावरून हटविण्याची मागणी आहे.

Web Title: Welcome passengers to iron bars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.