पोलीस पाटलांनी केले पोलीस अधीक्षकांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 10:02 PM2018-08-06T22:02:15+5:302018-08-06T22:02:30+5:30
महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस पाटील संटनेच्यावतीने पोलीस अधीक्षक बैजल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा शाखेच्यावतीने नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस पाटील संटनेच्यावतीने पोलीस अधीक्षक बैजल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात, वेळोवेळी कायद्यांमध्ये बदल होत असल्यामुळे कायद्याची जाणीव व्हावी याकरिता पोलीस पाटलांना प्रशिक्षण देण्यात यावे, गावामध्ये महिन्यातून एकवेळा फिरते पोलीस स्टेशनची संकल्पना राबविण्यात यावी, जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा पोलीस पाटील भवन निर्माण करण्यात यावे, पोलीस पाटलांना ओळखपत्र देण्यात यावे, तंटामुक्त समिती अध्यक्ष व पोलीस पाटील यांचे संयुक्त बँक खात्यात नाव समाविष्ट करण्यात यावे, पोलीस पाटलांना दर महिन्यात मानधन वेळेवर देण्यात यावे, पोलीस पाटलांचे मानधन आॅनलाईन करण्यात यावे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव तुरकर, कार्याध्यक्ष मोहनसिंह बघेल, जिल्हा सचिव मोहनसिंह चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष नर्मदा चुटे, साहेबराव बन्सोड, संघटक कुंजीलाल भगत, जिल्हा सहसचिव प्रविण कोचे, गायत्री पवार, कोषाध्यक्ष चंद्रपाल शहारे, प्रदीप बावनथडे, एस.एस. लंजे, तिर्थराज पटले, राहूल बोरकर, रविंद्र बिसेन, हिवराज ताजने, संजय हत्तीमारे, सुरेश कोरे, प्रदीप चुटे,आत्माराम गायधने, उमेश बावणकर, मनोज बडोले, हेमलता देशमुख, मंगला तिडके, इंदुमती रहांगडाले, इंदिरा चौधरी, उषा बोपचे, डी.एस. मेंढे, श्याम नागपुरे, अरविंद चौरे, बी.एस. साखरे आदि उपस्थित होते.