सहाही आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2017 12:29 AM2017-01-03T00:29:31+5:302017-01-03T00:29:31+5:30

गोरेलाल चौकातील हॉटेल बिंदलमध्ये गेल्या २१ डिसेंबरच्या पहाटे लागलेल्या आगीत सात जण अडकून

Well Being Well Being In This In The Inch Common Compledapt day In a loving Inch Common Inch bed In bed In a bed In bed bed acauch Whatever ac loving acch | सहाही आरोपी फरार

सहाही आरोपी फरार

Next

घटनेला ११ दिवस : न.प.चा अहवाल गुलदस्त्यात
गोंदिया : गोरेलाल चौकातील हॉटेल बिंदलमध्ये गेल्या २१ डिसेंबरच्या पहाटे लागलेल्या आगीत सात जण अडकून मरण पावले. या प्रकरणाच्या चौकशीत अनेक घटना समोर आल्या. मात्र अद्याप नगर परिषदेचा अहवाल आला नाही. त्यांची याबाबत दोनदा न.प. मुख्याधिकाऱ्यांची भेटही घेतली. मात्र निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याचे सांगत टाळले जात आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले सहाही आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी केलेल्या तपासात हॉटेल बिंदलच्या मालकाने अनेक प्रकारच्या परवानग्या घेतल्या नसल्याचे उघड झाले. खोल्यांमध्ये व्हेंटिलेशनची व्यवस्थासुद्धा केलेली नव्हती. एक्झॉस्ट फॅनची व्यवस्था नव्हती. आणीबाणीच्या प्रसंगासाठी इमरजंसी एक्झीस्ट ठेवलेले नव्हते. फायर अलार्म सिस्टमसुद्धा लावली नव्हती.
तपास अधिकारी बोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीचे नेमके कारण काही सांगता येत नसल्याचे विद्युत विभागाच्या अहवालात नमूद आहे. तर तहसील कार्यालयाच्या अहवालात सन २०१४ पासून रिन्यूअल नसल्याचे म्हटले आहे. तर फायर विभागानुसार आॅडिट रिपोर्ट नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र इमारतीबाबत नगर परिषदेचा अहवाल अद्यापही प्राप्त झाला नाही. त्यासाठी मुख्याधिकाऱ्यांची दोनदा भेट घेतली. मात्र निवडणूक कामात व्यस्त असल्याचे सांगत अहवाल पुढे ढकलले जात आहे. आरोपींना अटक करण्यात आली नसून कोणत्याही कलमांमध्ये वाढही करण्यात आलेली नाही. सर्व आरोपी फरार आहेत. (प्रतिनिधी)

‘त्या’ सिलिंडरचे रहस्य गुलदस्त्यात
४बिंदल हॉटेलमध्ये आग लागून सात जणांचा मृत्यू झाला. या हॉटेलमध्ये केवळ दोन सिलिंडरचा परवाना होता. मात्र प्रत्यक्ष तपासात एकूण २२ सिलिंडर आढळले. त्यामुळे अवैधपणे तिथे असलेले २० सिलिंडर कुठून आले? असा सवाल उपस्थित झाला आहे. याबाबत अद्याप गुन्हासुद्धा नोंद करण्यात आलेला नाही. प्रत्येक सिलिंडरवर क्रमांकही असतो. सिलिंडरच्या चौकशीत एचपी व इन्डेन गॅस एजंसीचे संचालकसुद्धा अडकण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Well Being Well Being In This In The Inch Common Compledapt day In a loving Inch Common Inch bed In bed In a bed In bed bed acauch Whatever ac loving acch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.