बाजार समितीत साकारणार सुसज्ज भाजीबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 10:14 PM2017-12-13T22:14:45+5:302017-12-13T22:15:10+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजी बाजाराकरिता शासनाने ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून भाजी बाजाराचे बांधकाम केले जाणार असून मागील अनेक वर्षांपासूनचा प्रलबिंत प्रश्न मार्गी लागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजी बाजाराकरिता शासनाने ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून भाजी बाजाराचे बांधकाम केले जाणार असून मागील अनेक वर्षांपासूनचा प्रलबिंत प्रश्न मार्गी लागला आहे.
शहरातील भाजी बाजार सध्या गंजबाजार परिसरात भरतो. भाजी बाजारात जागा नसल्याने भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसावे लागते. यामुळे वाहनचालक आणि ग्राहकांना सुध्दा मनस्ताप सहन करावा लागत होता. जागेअभावी फळ विक्रेत्यांना सुध्दा विविध अडचणीना तोंड द्यावे लागत होते. आ. गोपालदास अग्रवाल यांनी या समस्येची गांर्भियाने दखल घेत येथील भाजीबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हलवून तिथे भाजी विक्रेत्यांसाठी सुसज्ज भाजीबाजार तयार करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आ. अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनात शहरातील भाजीबाजाराची समस्या आणून दिली. तसेच सुसज्ज भाजीबाजार तयार करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत गोंदिया येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजीबाजार तयार करण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून सुसज्ज भाजीबाजार आणि कोल्डस्टोरेज तसेच इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास आणि फळ विक्रेत्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आ.अग्रवाल यांनी शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला.
पार्किंग प्लॉजाकरिता तीन कोटी मंजूर
मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते. वाहनचालकांसह बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनासुध्दा विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. वाहनतळाअभावी शहरवासीयांच्या समस्येत वाढ झाली होती. आ.अग्रवाल यांनी ही समस्या ओळखून ती मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदिया येथे पार्किंग प्लॉजा तयार करण्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शहर पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या १८ हजार ंस्के.फूट जागेवर बहुमजली पार्किंग प्लॉजा तयार करण्यात येणार आहे.