रुग्ण संख्या वाढतेय आरोग्य विभागाची तयारी काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:28 AM2021-03-19T04:28:12+5:302021-03-19T04:28:12+5:30
लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. तर मागील तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ...
लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. तर मागील तीन चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने नेमकी काय? तयारी केली आहे. याचा आढावा आरोग्य संचालक डॉ. पवार यांनी घेतला. जिल्ह्यात सध्या किती कोविड केअर सेंटर, डीसीएचसी, डीसीएच चालू आहेत. डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता यांची पदे भरली आहेत काय? कोविड केअर सेंटर सुरु केल्यास त्या ठिकाणी वार्डबाय, स्वीपर यांची नियुक्ती करण्याची काय? तयारी केली आहे. यासर्व गोष्टींचा आढावा आरोग्य संचालकांनी घेतला. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी शुक्रवारी जिल्ह्यात दोन ते कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे तसेच कंत्राटी तत्वावर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केली केली जाणार असल्याचे सांगितले. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने तयारी देखील सुरु केली असल्याची माहिती आहे.
........
रुग्ण संख्या वाढताच सुरु झाली धावपळ
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढताच आरोग्य विभागाची धावपळ सुरु केली आहे. कोविड केअर सेंटरमध्ये डॉक़्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे तसेच बंद केलेले कोविड केअर सुरु करण्यासाठी हायपाय हालविण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.