महिला कर्मचाऱ्याचा छळ अधिकाºयावर कारवाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:34 PM2019-07-18T22:34:07+5:302019-07-18T22:35:15+5:30

येथील जि.प.कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचा कक्ष अधिकाऱ्यांकडून छळ केला जात आहे. याची लेखी तक्रार सदर महिला कर्मचाऱ्याने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.शिवाय हा मुद्दा जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत सुध्दा उपस्थित करण्यात आला. मात्र यानंतर कुठलीच कारवाई करण्यात न आल्याने सदर महिला कर्मचाऱ्याने महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.

When the action is taken on the woman employee's harassment officer? | महिला कर्मचाऱ्याचा छळ अधिकाºयावर कारवाई केव्हा?

महिला कर्मचाऱ्याचा छळ अधिकाºयावर कारवाई केव्हा?

Next
ठळक मुद्देजि.प.मधील प्रकार : महिला आयोग्याकडे तक्रार, वरिष्ठांची बघ्याची भूूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील जि.प.कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचा कक्ष अधिकाऱ्यांकडून छळ केला जात आहे. याची लेखी तक्रार सदर महिला कर्मचाऱ्याने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली.शिवाय हा मुद्दा जि.प.च्या स्थायी समितीच्या बैठकीत सुध्दा उपस्थित करण्यात आला. मात्र यानंतर कुठलीच कारवाई करण्यात न आल्याने सदर महिला कर्मचाऱ्याने महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.
छळ करणारा अधिकारी जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागात सहायक प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत आहे.तर महिला कर्मचारी ही आरोग्य विभागात लिपीक पदावर कार्यरत आहे.
या महिला कर्मचाºयाला सदर कक्ष अधिकारी खाजगी भ्रमणध्वनीवर फोन करुन विभागात बोलावून अकार्यालयीन भाषेचा करुन अपमानास्पद वागणूक देवून मानसिक त्रास देत असल्याचा आरोप आहे. या प्रकराची तक्रार पिडीत महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहू, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, मुकाअ आणि महिला आयोगाला केली आहे. मात्र यानंतर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. यानंतरही सदर अधिकाºयाकडून महिला कर्मचाºयाला त्रास देण्याचा प्रकार सुरूच आहे.
सदर अधिकारी माझे कुणीही काहीही बिगडवू शकत नाही,मी जे बोलतो तेच सीईओ करतील अशी धमकी महिला कर्मचाऱ्याला देत असल्याचा आरोप केला आहे.
कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तणूक
सदर अधिकारी हा अनेक महिला कर्मचाऱ्यांसोबत अशीच वर्तणूक करुन दबाव तयार करतो. जि.प.मधील अनेक महिला कर्मचारी याप्रकारमुळे त्रस्त असून मानसीक दडपणाखाली काम करीत आहे.महिलांना धमक्या देणे, छळ करणे, याबाबत अनेक तक्रारी करुन सुध्दा सदर अधिकाऱ्यावर कुठलीच कारवाही केली जात नसल्याने कर्मचाºयांमध्ये रोष व्याप्त आहे.
जि.प.सदस्य लावून धरणार मुद्दा
जि.प.महिला कर्मचाऱ्याचा छळ होत असल्याची तक्रार करुन सुध्दा सीईओनी अद्याप कुठलीच कारवाई केली नाही.त्यामुळे शुक्रवारी आयोजित सर्वसाधारण सभेत हा मुद्दा लावून धरण्याची तयारी जि.प.सदस्यांनी केली आहे. त्यामुळे ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीच्या सभेत गाजला विषय
या प्रकरणाची दखल जिल्हास्तरीय महिला तक्रार निवारण सेल, गोंदिया यांनी घेवून पिडीत महिला व अन्य कर्मचाºयांचे बयाण नोंदविले आहे. स्थायी समितीच्या सभेत स्थायी समिती सदस्य सुरेश हर्षे, गंगाधर परशुरामकर यांनी उपस्थित करुन सदर अधिकाºयावर कारवाही करण्याची मागणी केली.मात्र यानंतरही सीईओ सदर अधिकाऱ्यावर कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदर अधिकाऱ्याला तीन दिवसात निलंबीत करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतरही कारवाई झाली नाही. त्यामुळे हा मुद्दा शुक्रवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करुन कारवाही न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अविश्वास प्रस्ताव आणू.
-सीमा मडावी जि.प.अध्यक्ष.

या प्रकरणाचा तपास सुरू असून चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित अधिकाºयावर कारवाही करण्यात येईल.
- नरेश भांडारकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग जि.प.

Web Title: When the action is taken on the woman employee's harassment officer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.