वीज उपकेंद्राची पाया भरणी कधी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:01 AM2018-08-01T01:01:52+5:302018-08-01T01:04:04+5:30

हा परिसर विद्युत समस्येने ग्रस्त आहे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी शेंडा येथे मिनी पॉवर हाऊस उभारण्याचे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठरविले होते. यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जागाही संपादित करण्यात आली.

When will the foundation of the electricity sub-station be established? | वीज उपकेंद्राची पाया भरणी कधी होणार

वीज उपकेंद्राची पाया भरणी कधी होणार

Next
ठळक मुद्देनिधीअभावी रखडले काम : विद्युत वितरणने लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा-कोयलारी : हा परिसर विद्युत समस्येने ग्रस्त आहे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी शेंडा येथे मिनी पॉवर हाऊस उभारण्याचे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठरविले होते. यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जागाही संपादित करण्यात आली. मात्र दोन वर्षांचा काळ लोटूनही विद्युत उपकेंद्राच्या पायाभरणीला सुरुवातच झाली नाही. त्यामुळे जनता व शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
वीज खंडीत होण्याच्या असंख्य तक्रारी होत्या. त्या दूर करण्याच्या हेतूने शेंडा येथे विद्युत उपकेंद्र उभारण्याचे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी ठरविले होते. तसेच ते मंजूरही झाल्याचे सांगण्यात आले होते. या कामासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जागेची निवड करण्यात आली. मात्र अद्यापही उपकेंद्र उभारणीच्या कामाला सुरुवातच झाली नाही. परिणामी जनतेच्या विद्युत विषयी समस्या सुटणार किंवा नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या परिसराला महाराष्ट्र वीज वितरण कंपनी देवरी येथील पॉवर हाऊसमधून वीज पुरवठा करण्यात येतो. शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोई मुबलक प्रमाणावर उपलब्ध असल्याने धानपीक किंवा इतर पिकांना पाणी देण्यासाठी विजेची वेळोवेळी गरज भासते. त्याशिवाय शेतकऱ्यांना पीक घेणे शक्य नाही. मात्र वीज वितरणकडून पुरेशा व नियमित वीज पुरवठा होत नसल्याने याचा परिणाम पिकांवर होवून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, ही वास्तविकता आहे.
वीज पुरवठा वारंवार खंडीत होणे, डीओ उडणे, तार तुटणे यासारख्या घटना नेहमीच घडतात. दिवसभर वीज पुरवठा सुरु असेल असे वर्षातून एकही दिवस नाही. त्यामुळे गावकरी व शेतकरी त्रासले आहेत. एवढेच नाही तर जोपर्यंत विद्युत उपकेंद्र तयार होणार नाही तोपर्यंत वीज समस्या सुटणार नाही, असे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच असल्याने विद्युतवर चालणाºया मोटारी काम करीत नाही. परिणामी पिकांचे मोठे नुकसान होते.
या प्रकाराकडे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष पुरवून विद्युत उपकेंद्राच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी या परिसरातील जनता व शेतकºयांनी केली आहे.

विद्युत उपकेंद्राच्या उभारणीसाठी ग्रामपंचायतने बांधकामा संबंधाने नाहरकत प्रमाणपत्र व जागा उपलब्ध करुन दिली आहे.
मोहनलाल बोरकर, सरपंच, ग्रामपंचायत शेंडा.

विद्युत उपकेंद्र उभारणी संबंधाने सर्वच प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. मात्र अद्याप त्या कामाचा निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे उपकेंद्र उभारणीचा कामाला सुरुवात झाली नाही.
एच.के. टेंभुर्णीकर, कनिष्ठ अभियंता, वीज वितरण, देवरी.

Web Title: When will the foundation of the electricity sub-station be established?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज