नायब तहसीलदाराचे रिक्त पद केव्हा भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:20 AM2021-06-29T04:20:24+5:302021-06-29T04:20:24+5:30
आमगाव : येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची पदे रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याचा सर्वाधिक फटका हा ...
आमगाव : येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांची पदे रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याचा सर्वाधिक फटका हा श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेला बसत आहे.
येथील तहसीलदार दयाराम भोयर यांच्या मदतीला ३ नायब तहसीलदार असायला हवे होते. पण सद्यस्थितीत केवळ एकच नायब तहसीलदार कार्यरत आहे. मात्र आता ते सुद्धा सुटीवर गेले असल्याने सर्व भार तहसीलदारांवर आला आहे. तहसीलदार यांच्याकडे आमगाव नगर परिषदेच्या प्रशासक पदाचासुद्धा प्रभार आहे. त्यामुळे त्यांचीसुद्धा या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना चांगलीच दमछाक होत आहे. नायब तहसीलदारांचे पद रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहे. तर एकाच कामासाठी वारंवार तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन नायब तहसीलदारांची रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
===Photopath===
280621\img-20210628-wa0010.jpg
===Caption===
तहसील कार्यालय