दोन लाख क्विंटल पाखड धान विकायचा कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:37 AM2019-12-17T00:37:21+5:302019-12-17T00:37:42+5:30
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ९ हजार ५३३ हेक्टरवरील धान पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने दिला आहे. तर याचा ३० हजारावर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली आहे. मात्र पाखड झालेले धान शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नसल्याने हे धान शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावे लागत आहे.
शेतकऱ्यांचा शासनाला सवाल : अवकाळी पावसाने नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका खरीप हंगामातील धानाला बसला. परिणामी मोठ्या प्रमाणात धान खराब आणि पाखड झाले. पाखड झालेले धान खरेदी केंद्रावर घेतले जात नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. परिणामी पाखड झालेला दोन लाख क्विंटल धान विकायचा कुठे असा प्रश्न निर्माण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ९ हजार ५३३ हेक्टरवरील धान पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने दिला आहे. तर याचा ३० हजारावर शेतकऱ्यांना फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली आहे. मात्र पाखड झालेले धान शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नसल्याने हे धान शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावे लागत आहे. मात्र ते सुध्दा शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा घेऊन मातीमोल दराने त्याची मागणी करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. परतीच्या पावसाने तिरोडा तालुकायत ५३ हेक्टर अर्जुनी मोरगाव तालुक्यात १४७४ हेक्टर, देवरी तालुक्यात १७४ हेक्टर, आमगाव तालुक्यात १६६७ हेक्टर, सडक अर्जुनी तालुक्यात १०९६ हेक्टर, सालेकसा तालुक्यात ९५३ हेक्टरवरील पिके परतीचे पावसाने बाधित झाली आहेत. ऐन धान कापणीच्या कालावधीत पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात कापणी केलेले धान भिजल्याने ते पाखड झाले. याचा फटका जवळपास ३० हजारावर शेतकºयांना बसला. परतीच्या पावसामुळे शेतकºयांचा तोंडचा घास हिरावला गेल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना हेक्टरी ८ हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. पण पाखड झालेले धान खरेदी करण्यासंदर्भात कुठलेच निर्देश शासनाने दिले नाही. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड धान खरेदी केले जात नाही. एकट्या गोंदिया जिल्ह्यात दोन लाख क्विंटल पाखड धान विकायचा कुठे असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. खासगी व्यापारी मातीमोल दराने पाखड धानाची मागणी करीत असल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. तर हमीभाव आणि बोनस मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील दहा हजार हेक्टरवरील धान पिकांना बसला. तसा अहवाल कृषी आणि महसूल विभागाने शासनाला पाठविला आहे. त्यामुळे शासनाने पाखड झालेले धान खरेदी करण्याचे निर्देश दिल्यास हजारो शेतकºयांना मदत होईल. शासनाने पाखड धान खरेदी करण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात करावी अशी मागणी आहे.
- गंगाधर परशुरामकर
जि.प.सदस्य.