नागरिकांच्या बँक खात्यात येणारे १५ लाख रुपये गेले कुठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 10:07 PM2018-05-19T22:07:36+5:302018-05-19T22:07:36+5:30
आमचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करु असे आश्वासन केंद्रातील मोदी सरकारने दिले होते. सत्तेवर येवून चार वर्षांचा कालावधी लोटत आहे. मात्र १५ लाख रुपये सोडा १५ रुपये सुद्धा नागरिकांच्या बँक खात्यात जमा झाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुकडी-डाकराम : आमचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करु असे आश्वासन केंद्रातील मोदी सरकारने दिले होते. सत्तेवर येवून चार वर्षांचा कालावधी लोटत आहे. मात्र १५ लाख रुपये सोडा १५ रुपये सुद्धा नागरिकांच्या बँक खात्यात जमा झाले नाही. त्यामुळे या सरकारला केवळ मोठी आणि खोटी आश्वासन देण्याचे काम चांगले येते. अशा सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन खा.प्रफुल्ल पटेल यांनी येथे केले.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपा-पिरीपा आघाडीचे उमेदवार अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ तिरोडा तालुक्यातील सुकडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला संबोधित करताना ते बोलत होते. आ. दिलीप बंसोड, तिरोडा तालुका काँग्रेस अध्यक्ष राधेलाल पटले, प्रदेश सचिव डॉ. योगेंद्र भगत, माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन, तिरोडा तालुका काँग्रेस दलित आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र जांभुळकर, जिल्हा काँग्रेस प्रतिनिधी विलास मेश्राम, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष धनराज पटले, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, माजी सभापती डॉ. किशोर पारधी, जि.प.सदस्य प्रिती रामटेके, मनोज डोंगरे, कैलास पटले, विणा बिसेन, सुनिता मडावी, सभापती निता रहांगडाले, उपसभापती मनोहर राऊत, सरपंच जयश्री गभणे, सरपंच प्रभा जांभूळकर,जगणलाल धुर्वे, इंद्रकला बावनथडे, बबलदास रामटेके, प्रल्हाद दखने, रामचंद्र गभरे, उषा बिसेन, उषा तुमसरे, अर्चना धुर्वे, जयश्री चंद्रीकापुरे, डॉ.अविनाश जायस्वाल, बंडू मरस्कोल्हे, दिनेश टेकाम, रवि पटले, हिवराज चौधरी, भूमेश्वर रंगारी, राजेश मेश्राम, संजय चंद्रिकापुरे, दिलीप बावनथडे उपस्थित होेते. पटेल म्हणाले, केंद्र व राज्यात सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, बेरोजगारी कमी करु, महागाई नियंत्रणात, विदेशातील काळा पैसा आणू, जीवनावश्यक वस्तुंचे दर आटोक्यात आणू असे आश्वासन सत्तारुढ सरकारने दिले होते. मात्र प्रत्यक्षात यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत: केली नाही. त्यामुळे अशा खोटारड्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे.
भंडारा गोंदिया क्षेत्राच्या विकासासाठी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपा-पिरीपा आघाडीचे उमेदवार अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांना साथ देण्याचे आवाहन पटेल यांनी केले. जगनलाल धुर्वे, विलास मेश्राम, हितेंद्र जांभुळकर, धनलाल पटले, बबलदास रामटेके, प्रेमकुमार रहांगडाले, डॉ. किशोर पारधी यांनी मार्गदर्शन केले.
या सभेला हजारोच्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सरपंच रवि पटले यांनी केले तर आभार प्रल्हाद दखने यांनी आभार मानले. खा. प्रफुल्ल पटेल यांनी अर्जुनी, पालडोंगरी, कवलेवाडा, मुंडीकोटा, नवेझरी, वडेगाव येथे आयोजित प्रचार सभांना मार्गदर्शन केले.