‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणारे आता कुठे गेले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:47+5:302021-07-10T04:20:47+5:30
देवरी : खा.प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला, शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. जे ...
देवरी : खा.प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला, शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. जे शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भाव देऊ म्हणतात, अच्छे दिनचे स्वप्ने दाखवतात, पण निवडणुकीनंतर विसरून जातात, त्यांना कुणी प्रश्न विचारत नाही, विरोधक सामान्य जनतेत भ्रम निर्माण करण्याचे काम करतात, त्यांचा भ्रमनिरास करा, खरे शेतकरी हितेशी कोण, हे जनतेने आता चांगले ओळखले आहे, असे प्रतिपादन माजी आ.राजेंद्र जैन यांनी केले.
तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद क्षेत्र पुराडाअंतर्गत गोटाबोडी, मुरदोली व नगरपंचायत देवरीअंतर्गत माँ धुकेश्वरी मंदिर सभागृह देवरी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक गुरुवारी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, सी.के. बिसेन, रमेश ताराम, गोपाल तिवारी, पारबता चांदेवार, भय्यालाल चांदेवार, चंचल जैन, मुन्नाभाई अंसारी, सुमन बिसेन, मुकेश खरोले, शर्मिला टेंभुर्णीकर, नेमीचंद आंबिलकर, जाकिरभाई, अर्चना ताराम, मंजुषा वासनिक, सुजीत अग्रवाल, योगेश जैन, दीपेश टेंभरे, दिनेश गोडसेलवार, उषा तिवारी, रूपाली गोडसेलवार, प्रमिला गावळ, अशोक चनाप, लक्ष्मी मेश्राम, कैलास टेंभरे, कोमल खरोले, तुकाराम वाघमारे, गेजी भाटिया, पुष्पा मस्के, जयेश मस्के, डाॅ. नरेश कुंभरे, पंकज शहारे, सारंग देशपांडे उपस्थित होते. पक्ष संघटन मजबूत करणे, पक्ष बांधणी व पक्ष विस्तार, बुथनिहाय चर्चा, आगामी पं.स., जि.प. व नगरपरिषद निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.