तंटामुक्तीचा अंकेक्षण अहवाल गेला कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2016 02:31 AM2016-09-25T02:31:53+5:302016-09-25T02:31:53+5:30

शासनाने दिलेल्या पुरस्काराच्या रकमेचे नियोजन गावांनी कशाप्रकारे केले हे पाहण्यासाठी शासनाने नियोजनाचा दाखला

Where was the dispatch report of the dispatch? | तंटामुक्तीचा अंकेक्षण अहवाल गेला कुठे?

तंटामुक्तीचा अंकेक्षण अहवाल गेला कुठे?

Next

ग्रामसेवकांचे दिरंगाई : खंडविकास अधिकारी उदासीन
गोंदिया : शासनाने दिलेल्या पुरस्काराच्या रकमेचे नियोजन गावांनी कशाप्रकारे केले हे पाहण्यासाठी शासनाने नियोजनाचा दाखला (अंकेक्षण अहवाल) पुरस्कार प्राप्त प्रत्येक तंटामुक्त गावाला मागितला. मात्र गोंदिया जिल्ह्यातील ५५६ ग्राम पंचायतींचा अहवाल गेलाच नाही. शासनाने मागूनही हा अहवाल गेलाच नाही.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबविणाऱ्या गावांना शासनाने पुरस्कार दिले. एका गावाला लाखापेक्षा अधिक पुरस्कार दिल्याने त्या पुरस्कार रकमेची अफरातफर तर झाली नाही. ही रक्कम गावाच्या विकासावर खर्च झाली किंवा नाही याची इतंभूत पाहणी करण्यासाठी शासनाने पुरस्कारप्राप्त गावांना नियोजनाचा दाखला (अंकेक्षण) अहवाल मागितला. पोलीस अधिक्षक कार्यालयातर्फे या नियोजनाच्या दाखल्यासाठी पत्र जावक क्र. जीवीशा/तंमुगा/स्मरणपत्र-२/२०१३-२७१० दिनांक २६/८/१३ पासून आजपर्यंत टप्यापट्याने पाठविण्यात आले. अनेकदा स्मरणपत्रही देण्यात आले. ग्रामपंचायतने तंटामुक्त मोहिमेच्या पुरस्काराची रकम कशाप्रकारे नियोजित केली. याची माहिती या अहवालात द्यायची होती. या अहवालात मिळालेले पैसे किती, खर्च झालेले किती व शिल्लक रक्कम फक्त देण्यात आली आहे.
परंतु किती रक्कम कोणत्या कामावर खर्च करण्यात आली. याची माहितीच दिली नाही. गोंदिया जिल्ह्यातील एकही गावांचा अंकेक्षण अहवाल शासनाला गेला नाही. शासन नियम धाब्यावर ठेऊन तंटामुक्तीच्या पैशाचा खर्च चुकीच्या पध्दतीने तर झाला नाही अशीही शंका येते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Where was the dispatch report of the dispatch?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.