कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:30 AM2021-08-15T04:30:06+5:302021-08-15T04:30:06+5:30
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुर्दशेचे गावे तेवढे गोडवे कमीच आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या पावसाळ्यात अधिकच गंभीर झाली आहे. ...
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुर्दशेचे गावे तेवढे गोडवे कमीच आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या पावसाळ्यात अधिकच गंभीर झाली आहे. या रस्त्यांवरून चालणे म्हणजे स्वत:चे कंबरडे मोडून घेण्यासारखेच झाले आहे. वांरवार या खड्ड्यांकडे लक्ष वेधून सुद्धा दखल घेतली जात नसल्याने आता गावकरीच आक्रमक झाले आहे. काही दिवसांपूर्वी आमगाव-कामठा मार्गावरील खड्ड्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर रोवणी केली. तर आता सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी-बेहळीटोला रस्त्याच्या समस्येला घेऊन गावकऱ्यांनी १५ ऑगस्ट रोजी या रस्त्यावरच चिखलनी करून रोवणी करण्याचा इशारा दिला. या इशाऱ्याची या दोन्ही विधानसभा क्षेत्रातील आमदारांनी चांगले मनावर घेतले असून थेट मुंबई गाठून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना रस्ते दुरुस्तीसाठी साकडे घातले. तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली. त्यामुळे आमदारांनी जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डेच चांगलेच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे.
-अंकुश गुंडावार