कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:33 AM2021-08-20T04:33:34+5:302021-08-20T04:33:34+5:30
मागील दोन महिन्यांपासून धान उत्पादक शेतकऱ्यांची बोनस आणि चुकाऱ्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पायपीट सुरू आहे. कधी भाईजीच्या ...
मागील दोन महिन्यांपासून धान उत्पादक शेतकऱ्यांची बोनस आणि चुकाऱ्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पायपीट सुरू आहे. कधी भाईजीच्या दारात तर कधी नानाभाऊंना गाठून शेतकरी आपली व्यथा मांडत आहेत. ते सुद्धा पंधरा दिवस प्रतीक्षा करा, एवढेच आश्वासन त्यांना दिले जात आहे. याच आश्वासनावर भोळा शेतकरी जगत आहे; मात्र पाहता पाहता दोन महिने लोटले तरी ना बोनस, ना चुकारे मिळाले. त्यामुळे आता कोणत्या नेत्याच्या दारात उभे राहायचे की सावकाराकडून कर्ज घेऊन गरज भागवायची, अशा पेचात बळीराजा सापडला आहे. दररोज बँका आणि केंद्रावरून जाऊन चुकारे आणि बोनस आले का म्हणून विचारपूस करणे हाच शेतकऱ्यांचा नित्यक्रम झाला आहे; मात्र यासाठी आता शासन आणि प्रशासनाला पाझर केव्हा फुटणार आणि शेतकऱ्यांच्या हातात चुकारे केव्हा पडणार, याकडे लक्ष आहे.
-अंकुश गुंडावार